‘पवार साहेबांनी ‘तो’ प्रश्न विचारला अन् पुढं काय झालं ते सर्वांनाच माहितीये’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी हेलिकॉप्टरनं फिरत आपल्या उमेदवारांचा प्रचार केला होता. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते. याच हेलिकॉप्टरमुळं माझं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे लोकसभेचं तिकीट कापलं गेलं होतं. असं वक्तव्य सुजय विखे यांनी आज भर सभेत केलं. सुजय विखे म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला त्यावेळी विचारलं होतं की, तू आताच हेलिकॉप्टरमधून फिरतोस. निवडून कसा येणार ? पुढं काय झालं हे सर्वांनाच माहिती आहे.

आज वाकळी येथे झालेल्या एका कार्यक्रमात भाजपच्या एका पदाधिकाऱ्यानं विखेंसमोरच त्यांच्या हेलिकॉप्टर प्रचाराची आठवण करून दिली. हा धागा पकडत विखे यांनी चौफेर फटकेबाजी केली. आपल्या भाषणात त्यांनी हेलिकॉप्टर प्रवासामुळं झालेला फायदा आणि तोटा याचा किस्साच सांगितला आहे. 2017 मध्ये झालेल्या नगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नगर जिल्ह्याच्या राजकारणात विखेंचा हवाई प्रचार चांगलाच गाजला होता.

सुजय विखे म्हणाले, “आता मी भाजपचा खासदार आहे. आपलं हेलिकॉप्टर तेव्हाही होतं आणि भविष्यातही फिरत राहणार. त्यावेळी हेलिकॉप्टरमुळं माझं तिकीट कापलं गेलं होतं. त्यावेळी मी काँग्रेसमध्ये होतो आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला विचारलं होतं तू आताच हेलिकॉप्टरमधून फिरतोस. निवडून कसा येणार ? पुढं काय झालं हे सगळ्यांनाच माहिती आहे.”

पुढे बोलताना सुजय विखे म्हणाले, “त्यावेळी माझं नुकसान झालं. पण आता वाटतं बरं झालं की, त्यांचं तिकीट मिळालं नाही. आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाचा खासदार आहे आण मी आनंदीही आहे.”

You might also like