महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘ते’ माहित नाही : विनोद तावडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ती पाच वर्षांपूर्वीची घटना आहे आणि हे आत्ता बाहेर काढत आहेत. त्यानंतर मी राजनाथसिंह यांच्यासोबत गाडीतून, विमानातून, ट्रेनमधून अनेक दौरे केलेत. पण हे भाड्यानं विकलेल्या मनसेला माहित नाही. अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता तिसऱ्या टप्यात मतदानासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. याचदरम्यान, मनसेने विनोद तावडेंना तुमच्या गाडीत बसू देण्याची एकदा संधी द्यावी असे पात्र गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पाठवले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मनसेवर जोरदार टीकास्त्र सोडले. राजनाथ सिंहांच्या गाडी सोबतच जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ती पाच वर्षांपूर्वीची घटना आहे, त्याचा आताच्या निवडणुकांशी काहीही संबंध नाही. मात्र विरोधी पक्ष हे आता बाहेर काढत आहेत. असे विनोद तावडे यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, त्यानंतर मी राजनाथसिंह यांच्यासोबत गाडीतून, विमानातून, ट्रेनमधून अनेक दौरे केले आहेत. मात्र जे भाड्यावर विकले जातात त्या मनसेला हे माहिती नाही. असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, नवी मुंबईतील मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी विनोद तावडेंना तुमच्या गाडीत बसू देण्याची एकदा संधी द्यावी असे पात्र गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पाठवले होते. तसेच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी इचलकरंजी येथील सभेत विनोद तावडेंना विनोदी नेता असे म्हणत राजनाथसिंहांचा ड्रायव्हर ज्यांना आपल्या गाडीत बसू देत नाही, त्यांनी राज ठाकरेंबद्दल बोलू नये. अशी टीकाही केली होते.