‘मला तसे म्हणायचे नव्हते, ट्रोल झाल्याने रवीनाचा ‘यू टर्न’

मुंबई – शेतकऱयांच्या संपाबद्दल रवीनाने आंदोलक शेतकऱ्याना जेल मध्ये टाका ,त्यांना जामिनी देखील देऊ नका असे वादग्रस्त ट्विट केले होते. या ट्विटमुळे रविना चांगलीच ट्रोल झाली . सर्व स्तरातून तिच्यावर टीका होऊ लागल्या . काही काळानंतर , मात्र तिने तिचे ते ट्विट दिलीत करून टाकले. आता या सगळ्या प्रकरणानंतर मात्र ति मी नव्हेच अशी भूमिका रवीनाने घेतली आहे.

रवीनाने आपल्या ट्विटचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांना नाही, शेतमालाची नासधूस करणाऱ्या समाजकंटकांना अटक करा, असे म्हणाले असल्याचे स्पष्टीकरण रवीना टंडनने दिले आहे. मी नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने असत, त्यांच्या सर्व समस्या, अडचणी सुटाव्यात, अशी प्रार्थना करत असते. मी केवळ अंदोलनकर्त्यांनी अन्न फेकून देऊ नये, गरिबांना वाटावे, अशी विनंती केली होती, माझ्या ट्टिवचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असेही रवीना म्हणाली आहे.

रवीनाचे ट्विट काय होते

किती दुर्दैवी घटना घडत आहे. आंदोलनाची ही पद्धत भीषण आहे. सार्वजनिक संपत्ती, वाहतूक आणि साहित्याचं नुकसान करणे दुर्दैवी आहे. आंदोलकांना तातडीने अटक करावी आणि त्यांना जामीनही देऊ नये. असे ट्विट रवीनाने केले होते.