’40 वर्षे राजकारण केलं, कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मी गेल्या चाळीस वर्षापासून राजकारण (politics) करतो आहे. मात्र कधीही कुणाच्या पाठीत खंजीर (dagger) खुपसला नाही. तोंडावर गोड बोलायचं, तुम्ही ज्येष्ठ म्हणायचं आणि मागून खंजीर खुपसायचा हे मी कधीही केलं नाही. 40 वर्षे मी भाजपाची (bjp) सेवा केली. त्याबदल्यात मला काय दिलं पक्षाने ? माझ्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर भाजपाचे लोक देऊ शकले नाही. मी पक्ष सोडावा अशी कार्यकर्त्याची भावना होती. तोंडावर गोड बोलायचं आणि पाठिमागे कारवाया करत रहायचं हे मी कधी केलं नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना टोला लगावला. शरद पवार (sharad pawar) यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी राष्ट्रवादीत (ncp) प्रवेश केल्यानंतर भाजपवर हल्लाबोल केला.

कुणी किती भूखंड घेतले मी दाखवून देईन

भूखंडाची चौकशी माझ्या मागे लावण्यात आली. काही दिवस जाऊद्या कुणी किती भूखंड घेतले आहेत ते मी दाखवून देईल. नियमाच्या बाहेर जे वागले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी करणार असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. राजकीय जीवनातून घरी बसण्याचीच तयारी केली होती. भाजपाला हेच वाटत होतं, कारण मला भाजपा तर काही देणार नाही. तिकिट मागितलं तर म्हणतात तुम्ही ज्येष्ठ आहात.

पहाटेच्या शपथविधीवर खडसेंची टीका

मला सांगतात, नाथाभाऊ तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. चार दिवस ज्यांना भाजपात येऊन झाले नाहीत असे लोक म्हणतात मार्गदर्शन करा. मी राष्ट्रवादीत जाणार तर बोंबाबोंब झाली. मग तुम्ही सकाळी पाच वाजता शपथ घेतली तेव्हा तुम्हाला राष्ट्रवादी पक्षच चांगला वाटला ना ? पहाटे पाचला जसा तुम्हाला राष्ट्रवादी पक्ष चांगला वाटला होता, त्यापेक्षा मला राष्ट्रवादी पक्ष चांगला वाटतो आहे. म्हणून मी राष्ट्रवादीत आलो असं म्हणत पहाटेच्या शपथविधीवरही खडसेंनी टीका केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like