नरेंद्र मोदी, अमित शहांना न भेटता मी ‘मंत्री’ झालो, रामदास आठवलेंचा शिवसेनेला ‘टोमणा’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुका पार पडून मंत्रिमंडळ स्थापना देखील झाली. ३५३ जागा जिंकणाऱ्या भाजपप्रणित एनडीएने आपल्या मित्रपक्षांना मात्र मंत्रिमंडळात एकच मंत्रिपद दिले आहे. त्यामुळे काही मित्रपक्ष नाराज देखील झाले आहेत. महाराष्ट्र्रात देखील भाजपचा मित्रपक्ष असणारी शिवसेना देखील अवजड उद्योग खाते मिळाल्याने नाराज झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावर आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे.

मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले कि, मी ना मोदींना भेटलो; ना अमित शाह यांना भेटलो तरीदेखील मला थेट मंत्रिपद मिळालं. त्यामुळे मंत्रीपद कसे मिळवायचे हे माझ्याकडून शिकावे असेही त्यांनी म्हटले आहे. या लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले यांनी महायुतीकडे मुंबईतील एका जागेची मागणी केली होती, मात्र त्यांना या लोकसभा निवडणुकीत एकही जागा देण्यात आली नव्हती. मात्र त्यांचे मंत्रिपद तसेच ठेवण्यात आल्याने ते खुश दिसत आहेत.

त्याचबरोबर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या विषयावर देखील भाष्य केले. शरद पवार यांना काँग्रेसपेक्षा जास्त वजन असल्याने त्यांनी आमच्याकडे यावे, अशी ऑफरदेखील त्यांनी शरद पवार यांना दिली. त्याचबरोबर मी इकडे असताना शरद पवार तिकडे कसे काय अशी कोपरखळी देखील त्यांनी शरद पवार यांना मारली.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर देखील त्यांनी भाष्य करताना म्हटले कि, मंदिर कायदेशीर पद्धतीने बांधलेले असावे असेही आठवलेंनी स्पष्ट केले. त्याचबरोबर यासाठी मुस्लिम समाजावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकता काम नये, असेदेखील त्यांनी म्हटले.

आरोग्यविषयक वृत्त –

पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे

‘या’ पाण्याचे आहेत अनेक फायदे ; अशक्तपणा दूर करण्यासह बरच काही

छातीत जळजळ होत असल्यास दुर्लक्ष करू नका ; गंभीर आजाराचा संकेत

काळजी घ्या ; कमी झोप घेण्याचा थेट संबंध ‘ब्लड प्रेशर’शी