अभिनेता विकी कौशल ‘या’ गोष्टी पाहूनच सिलेक्ट करतो चित्रपट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – संजू, मसान, उरी: द सर्जिकल स्ट्राइक आणि मनमर्जियां यांसारखी एका मागे एक सुपरहिट चित्रपटासोबत विकी कौशलने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. त्याचा पंजाबी लुक आणि अभिनयाने अनेकांचे प्रेरणा स्थान बनला आहे. त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारुन चाहत्यांच्या मनात घर केले आहे. आता विकी कौशल शूजीत सरकारच्या ‘सरदार उधम सिंह’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट १९१९ मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडसाठी जनरल डायरची हत्या करणाऱ्या उधम सिंहवर आधारीत आहे.

काही दिवसांपुर्वी सरदार उधम सिंहच्या रुपात विकीचा पहिला लुक सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. विकीने सांगितले की, ‘शूजीत यांच्यासोबत काम करणे हे माझे स्वप्न होते’. या चित्रपटाच्या भूमिकेसाठी त्याला कास्ट केले तेव्हा विकीला खूप छान वाटले. हा चित्रपट २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. एका मुलाखतीत शूजीत सरकारने राहिलेली शूटिंग पुढच्या महिन्यात सुरु करणार आहे, असे सांगितले.विकीने पुढे म्हणाला की, ‘आम्ही हा चित्रपट बनविण्यासाठी पुर्णपणे मेहनत घेत आहोत. एका क्रांतीकारी उधम सिंहबद्दल ही एक अद्भूत कहाणी आहे आणि हे माझे स्वप्न होते की मी शूजीत यांच्यासोबत काम करावे’.

चित्रपटाची निवड करण्यासाठी तो कोणता प्लॅन करत नाही. जर त्याला चित्रपटाची स्क्रिप्ट आणि निर्देशन पसंत पडले तरच तो चित्रपटात काम करतो.सरदार उधम सिंहची बायोपिक या व्यतिरिक्त शूजीत सरकार अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुरानासोबत ‘गुलाबो सीताबो’ चित्रपटावर काम करत आहे. दूसरीकडे विक्की कौशल, करण जोहर आणि शशांक खेतान च्या हॉरर चित्रपट भूत: पार्ट वन-द हॉन्टेड शिपमध्ये दिसणार आहे. यामध्ये भूमि पेडनेकरचा कैमियो असणार आहे. हा चित्रपट १५ नव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे

२१ जून जागतिक योग दिन : ” हे ” आहेत भारतातील सर्वात मोठे योगगुरू

तुमचे आरोग्य कसे आहे ? याचे उत्तर देईल तुमची जीभ

शरीराचा गंध सांगेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलु

‘त्या’ महिलेचे स्तनांची रहस्यमय पद्धतीने वाढ, डॉक्टर्सही चिंतेत

मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची

सिने जगत

अमिताभच्या ‘गुलाबो सिताबो’चा फर्स्ट लुक ‘आऊट’, खडूस म्हातार्‍याच्या भुमिकेत ‘बिग बी’

रेड कार्पोटवरील जान्हवी कपूरच्या ‘बोल्ड’ अंदाजाने वातावरण ‘गरम’