मी वडिलांना पाहिलेच नाही! मला आईची जात हवीय… 

नागपूर : पोलीसनामा  ऑनलाईन

नागपुरात एका तरुणीने तिच्या आईची जात हवी अशी मागणी केली आहे. वडिलांना तिने बघितलेच नाही. जन्मपाससून ते आज वयाच्या १८ वर्षापर्यंत तिचा सांभाळ आईने केला असून आजही आई सोबतच राहते. आंचल ही गंजीपेठ परिसरात आई भारती बडवाईक यांच्यासोबत राहते.
[amazon_link asins=’B01LXHKR4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’defeeb1b-924f-11e8-8986-95c7e560e040′]
भारती यांचा विवाह १९९७ मध्ये झाला. ज्या व्यक्तीसोबत विवाह झाला त्या व्यक्तीने आपली फसवणूक केली आहे, हे लक्षात आल्यानंतर भारती यांनी अवघ्या अडीच ते तीन वर्षांत वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. चिमुकल्या आंचलला घेऊन भारती माहेरी राहू लागल्या. आंचलला स्वत:चे नाव देऊनच भारती यांनी मोठे केले. पतीपासून विभक्त राहणाऱ्या भारती यांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला.

आंचलकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला आईच्याच नावाने असताना मला जातीच्या प्रमाणपत्रावर आईची जात का मिळत नाही, असा सवाल उपस्थित करत नागपुरात तिचा कायदेशीर लढा सुरू आहे.

मला न्याय का मिळत नाही?
आंचलला डॉक्टर व्हायचं आहे. तिने सध्या यवतमाळ येथील मेडिकल कॉलेजला खुल्या प्रवर्गातून एमबीबीएसला प्रवेश घेतला. जातीचे प्रमाणपत्रच नसल्याने आंचल हिने खुल्या प्रवर्गातून एमबीबीएसला प्रवेश घेतला. ईबीसी श्री छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशीप योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आंचलने अर्ज केला. मात्र तेली जात ओबीसीमध्ये येत असल्याचे सांगून ही स्कॉलरशीपही नाकारण्यात आली. दुसऱ्याठिकाणी जातपडताळणी समितीने तेली समाजाचे जात प्रमाणपत्र नाकारलं. आता नक्की कोणत्या मार्गाने मला न्याय मिळेल हे, मला न्याय का मिळत नाही, असा प्रश्न आंचलने उपस्थित केला आहे.