माझी छाती ५६ इंचांची नाही , पण माझ्या मनगटात दम आहे…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ काल वाढवण्यात आला . त्यावेळी सभेत बोलतांना शरद पवार म्हंटले की , माझी छाती ५६ इंचांची नाही , पण माझ्या मनगटात मात्र दम आहे . असे बोलून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत टिका केली .

शरद पवार म्हणाले की , आजच्या भाषणात अजित एक गोष्ट बोलला की , जी मला अजिबात आवडलेली नाही . तो म्हणाला की , साहेब या वयात एवढे फिरत आहेत .  म्हणजे मी काय म्हातारा झालो का ? मला हे कदापी आवडलेले नाही .  ठिक आहे माझी छाती ५६  इंचांची नाही पण माझ्या मनगटात मात्र दम आहे . मी देशात बदल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही .  मी राज्यसभेत आहेच ,  त्यासाठी एकटा पुरेसा आहे . आम्ही यशवंराव चव्हाण यांचा वारसा चालवला , पण आता या पुढची २५ वर्ष चालवण्यासाठी नवख्या पिढीची गरज या देशाला आहे . ही पिढी घडवण्यासाठी येणारी निवडणूक महत्वाची ठरणार आहे.

मी पार्थ पेक्षा दोन वर्षींनी लहान होतो , तेंव्हा पासून मी १४ निवडणूकां लढवल्या व त्यात मला जनतेने निवडून दिले . त्या बद्दल मी जनतेचा ऋणी आहे. शरद पवार बोलतांना म्हंटले की , अजित पवार हे नवीन असतांना , तुम्ही तेंव्हा त्यांना साथ दिली . तुमच्या मुळेच ते दिल्लीत गेले होते . तेंव्हा पासून ते जनतेसाठी झुंजत आहेत . तीच संधी आता पार्थला मिळाली आहे . तरुण वयात संधी मिळणे हे चांगलेच असते. त्यामुळे जनतेने पार्थला या निवडणूकीत संधी द्यावी ,  असे शरद पवार यांनी जनतेकडे साकडे घातले.