‘नाईट लाईफ’ हा शब्दच मला आवडत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नाईट लाईफचा प्रयोग प्रायोगिक तत्वावर मुंबईतील नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल या तीन ठिकाणी राबवला जाणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. 26 जानेवारीपासून हा प्रकल्प सुरु होणार आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की प्रत्येक शहराची स्वतंत्र संस्कृती असल्यामुळे नाईट लाईफचा प्रस्ताव राज्यभर राबवणे योग्य ठरणार नाही. मुंबईत आपण ठराविक ठिकाणी हा प्रयोग सुरु करु शकतो. मूळात मला नाईट लाईफ हा शब्दच आवडत नाही.

आदित्य ठाकरेंच्या नाईट लाईफच्या निर्णयावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केले. सुरुवातीला काही निवडक भागात म्हणजेच मॉल्स, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल 24 तास खुले ठेवण्याची परवानगी देण्यात येईल. यानंतर या सर्वांचे मुल्यांकन होईल. यातून लोकांच्या तक्रारी देखील दूर करण्यात येईल.

आदित्य ठाकरे यांनी 16 जानेवारीला महानगरपालिका आयुक्त, पोलीस प्रमुख, मॉल आणि हॉटेल असोसिएशनच्या प्रमुखांची भेट घेतली. काळा घोडा, वांद्रे कुर्ला संकुल आणि नरिमन पॉइंट सारख्या अनिवासी भागात प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला गेला. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी 26 जानेवारीपासून या प्रकल्पाची सुरुवात होईल. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाईट लाईफ संदर्भात बोलताना सुरक्षेचे कारण पुढे केले होते. परंतू त्यानंतर त्यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली.

फेसबुक पेज लाईक करा –