‘मी पुरुषांसोबत झोपत नाही’ : विधानसभा अध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे कर्नाटकचे विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार आपल्या वादग्रस्त वक्तव्यमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काँग्रेसचे जेष्ठ नेते के. एच. मुनियप्पा यांनी १५ फेब्रुवारी रोजी ‘रमेश कुमार आणि आपण पती, पत्नीप्रमाणे आहोत. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही’, असे वक्तव्य केले होते. याबाबत के. आर. रमेश कुमार यांना विचारल्यानंतर ‘मी पुरुषांसोबत झोपत नाही’, असे उत्तर त्यांनी दिले आहे. त्यामुळे आता रमेश कुमार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे मात्र नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. याबाबतचे ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

के. एच. मुनियप्पा यांच्या वक्तव्यावर प्रतीक्रिया देताना रमेश कुमार म्हणाले की, ‘मी पुरुषांसोबत झोपत नाही. मी कोणासोबतही झोपत नाही. माझी एक पत्नी असून गेल्या दहा वर्षांपासून मी विवाहित आहे. मुनियप्पा यांना माझ्यासोबत झोपण्यात रस असू शकतो, पण माझी तशी कोणतीही इच्छा नाही. माझे कोणाशीही कोणतेच संबंध नाहीत’.

लोकसभेच्या तिकिटासाठी रणनीती ?
दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुनियप्पा यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळू नये यासाठी रमेश कुमार यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांनी अनेकदा मुनियप्पा यांच्यावर उघड टीकाही केली आहे. दरम्यान मुनियप्पा लोकसभा तिकीट मिळावी यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे कोलार लोकसभा मतदारसंघतील पाचही आमदार मुनियप्पा यांना तिकीट मिळू नये यासाठी पक्षावर दबाव आणत असल्याची माहिती आहे.