एक्सपर्टशी प्रश्नोत्तरे : मी श्वास घेताना आवाज येतो आणि जडपणा जाणवतो काय करावे ?

पोलीसनामा ऑनलाइन –
प्रश्न : मी श्वास घेताना आवाज येतो आणि जडपणा सुद्धा जाणवतो, यावर काय उपाय आहे ? – आकाश, ई-मेल वर
उत्तर : मॅक्स हॉस्पिटलचे डायरेक्टर आणि पल्मोनोलॉजिस्ट डॉ. विवेक नांगिया म्हणतात, धाप लागण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की, सर्दी-ताप, खोकला, भुकेपेक्षा जास्त खाणे, लठ्ठपणा, उंचावरील ठिकाण, जास्त थंड किंवा जास्त गरम हवामान, फुफ्फुसात छोटीशी समस्या, श्वसननलिका जाम होणे, प्रदुषण इत्यादी.

जर श्वास घेण्यास त्रास होत असेल तर घाबरण्याचे कारण नाही, कारण यातून लवकरच आराम मिळेल. सर्दी-ताप आणि खोकल्यासाठी तुळस-आल्याचा काढा प्या आणि गरम पाण्यात बाम टाकून वाफ घ्या. काही दिवसांपर्यंत गरम पाणी प्या.

लठ्ठपणा कमी करणे आवश्यक आहे आणि फुफ्फुसांच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी व्यायाम, योगा करा. श्वासननलिका जाम झाली असेल तर कोमट पाणी प्या आणि जेवण भूकेपेक्षा थोडे कमी खा. घर नेहमी बंद ठेवू नका, कारण शुद्ध हवा घरात येणे आवश्यक आहे.

अ‍ॅक्टिव्ह आणि हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करा. हेल्दी डाएट घ्या. जेवणात सुकामेवा, बी आणि मासे यांचे सेवन करा. धुळीची अ‍ॅलजी असेल तर त्यापासून दूर रहा. श्वासाची समस्या चिंतेचा विषय बनू शकते. अनेक बाबतीत हे गंभीर आजाराचे संकेत मानले जाते.

हार्टशी संबंधीत समस्यांची सुरूवात सुद्धा श्वासाच्या समस्येपासून होते. बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे सुद्धा श्वास घेण्यास समस्या होते. ज्या लोकांना अस्थमाची समस्या आहे, त्यांना याचा जास्त धोका असतो. सतत श्वास घेण्यास समस्या होते, किंवा स्थिती खुप वेळ तशीच राहात असेल तर उपचार करणे आवश्यक आहे. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.