CM फडणवीस, अजित पवारांचा शपथविधी झाल्यानंतर नितीन गडकरींनी दिली ‘ही’ पहिली प्रतिकिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – क्रिकेटमध्ये आणि राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विधानसभेच्या निकालानंतर केले होते. त्याला जोडून राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर आता नितीन गडकरींनी पुन्हा विधान केले की मी आधीच सांगितलं होतं की क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकते, आता तुम्हाला कळू शकतं की मला तेव्हा काय म्हणायचे होते.

राज्यात आज अशा काही राजकीय घडामोडी घडल्या की सत्तास्थापनेचे सर्वच फासे पलटले. आज सकाळी राजभवनावर जाऊन भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रमुख नेते अजित पवार यांनी सत्तास्थापन केली आणि राज्यातील सर्वांना मोठा धक्का दिला. राजभवनावर जाऊन फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

त्यानंतर आज शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान अजित पवारांवरील कारवाईचा निर्णय बैठकीत घेण्यात येईल. अजित पवार यांच्याबाबत निश्चित निर्णय घ्यावा लागेल आणि घेतला जाईल असे शरद पवारांनी सांगितले.

Visit : Policenama.com