माझ्यामध्ये होती ‘कोरोना’ व्हायरसची ‘लक्षणं’, ‘या’ टेक्नीकमुळं दिली ‘मात’, ‘हॅरी पॉटर’च्या लेखिकेनं सांगितलं

पोलीसनामा ऑनलाईनहॅरी पॉटरची लेखिका जे के रोलिंग हिनं एक टेकनिक सांगितली आहे जी कोरोनाशी लढताना कामी येऊ शकते. तिनं ट्विट करत सांगितलं आहे की, तिच्यात कोरोनाची लक्षणं होती. परंतु श्वास घेण्याच्या एका खास टेकनिकमुळं आता ती पूर्णपणे बरी झाली आहे.

ब्रिटेनच्या डॉक्टरांनी सांगितली ही टेकनिक

54 वर्षीय लेखिकेनं सांगितलं की, गेल्या दोन आठवड्यांपासून तिला कोरोनाची लक्षणं जाणवत होती. परंत एका खास टेकनिकनं ती पूर्णपणे बरी झाली आहे. तिनं तिची कोरोना टेस्ट तर नव्हती केली परंतु तिनं तिचा पती डॉक्टर नील मरे याचा सल्ला ऐकला. 2 आठवड्यातच ती निरोगी झाली. तिनं ट्विटमध्ये व्हिडीओ शेअर करत त्या टेकनिकबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये रोलिंगनं लिहिलं की, “युकेच्या क्वीन्स हॉस्पिटलमधील हे डॉक्टर समजून सांगत आहेत की, श्वसनाच्या तक्रारी कशा दूर केल्या जातात. गेल्या दोन आठवड्यांपूर्वी माझ्यात कोरोना संक्रमणाची लक्षणं होती. मी पतीचा सल्ला मानत या टेकनिकला फॉलो केलं. आता मी पूर्णपणे रिक्वहर झाले आहे. या टेकनिकची मला खूप मदत झाली.”

ही टेकनिक फ्री असून याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. डॉक्टरांनीही या टेक्निकचं समर्थन केलं आहे असंही रोलिंगनं सांगितलं आहे.