‘पाडापाडी’ करणार्‍यांचे ‘ते’ पुरावे मी प्रदेशाध्यक्षांकडे सोपवले, एकनाथ खडसेंनी सांगितलं

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभेचे निकाल लागले, भाजपची सत्ता गेली. त्यानंतर भाजपमधील नेत्यांची नाराजी आता डोके वर काढू लागली आहे. भाजपमधील काही नेत्यांमधून सध्या नाराजीचे सूर उमटतं आहेत. काही दिवसांपासून भाजपमधील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज असल्याचे दिसत आहे.

आज भाजपची उत्तर महाराष्ट्र स्तरावरील 5 जिल्ह्यांची बैठक दुपारी पार पडली, यात खडसेंनी अचानक उपस्थिती लावली. परंतू बैठकीतून बाहेर पडल्यानंतर देखील खडसेंच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली. त्यानंतर आता त्यांनी विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांना पाडणाऱ्यांची नावे एकनाथ खडसे यांनी प्रदेशाध्यक्षांकडे दिल्याचे सांगितले.

एकनाथ खडसे म्हणाले की ओबीसी नेत्यांमुळे पक्ष मोठा झाला. काही लोकांकडून सातत्याने अन्याय होतोय. विरोधी भूमिका करणाऱ्यांवर पक्ष कारवाई करेल. एकनाथ खडसेंनी दावा केला की मी प्रदेशाध्यक्षांकडे पुरावे सोपवले आहेत. आज एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यात चर्चा झाली.

याआधी पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबूकवर पोस्ट लिहित आपल्या समर्थकांत सूचक संदेश पोहचवला. त्यानंतर पंकजा मुंडे भाजपला निरोप देतील अशी चर्चा होती. त्यानंतर आता भाजपचे अनेक नेते बंडाचा करण्याच्या विचारात दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली होती.

Visit : Policenama.com