भाजपाने दिली होती जयंत पाटील यांचा राजकीय ‘गेम’ करण्याची ‘ऑफर’ !

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – जयंत पाटील यांच्या विरोधात उमेदवार देण्याची ऑफर भाजपाच्या बड्या नेत्याने दिली होती. मात्र, आमदारकी, मंत्रीपद मिळवण्यासाठी राजारामबापूंच्या घराण्याशी गद्दारी करणार नाही अशी भूमिका जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी स्पष्ट केले. भाजपाने एक प्रकारे जयंत पाटील याचा राजकीय गेम करण्याची ऑफरच दिली होती, असे ही ते म्हणाले.

राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ गुरुवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात झाला यावेळी दिलीपतात्या पाटील यांनी हा गौप्यस्फोट केला. पाटील यांनी हा गौप्यस्फोट ज्या नेत्याने ऑफर दिली होती त्याच नेत्यासमोर केला. भाजपाच्या त्या नेत्याने मला ऑफर देताना मुख्यमत्र्यांसोबत चर्चा करण्यास सांगितले होते. ही ऑफर केवळ पक्षप्रवेशापुरती नव्हती, तर जयंत पाटील यांच्या विरोधात मला उभे करून जयंत पाटील यांचा राजकीय ‘गेम’ करण्यापर्य़तची होती. मात्र, आपण ही ऑफर धुटकावून लावली.

राजारामबापूंनी मला मानसपूत्र मानले होते. संपूर्ण राज्यात माझी आजही तशीच ओळख आहे. आमदारकी, मंत्रीपदे मिळवण्यापेक्षा राजारामबापूंचा मानसपुत्र ही पदवी माझ्यासाठी महत्वाची असल्याचे दिलीपतात्या पाटील यांनी यावेळी सांगितले. राजारामबापूंच्या प्रेमापोटी आम्ही त्यांच्या पश्चात जयंत पाटील यांना राजकारणात आले. त्यांना साथ देत आजपर्यंतचा प्रवास केला. क्षमता असून देखील पदे मिळाली नाहीत, याचे कधी दु:ख झाले नसल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त