आघाडी सोबत गेल्याचा ‘पश्चाताप’ नाही ; जनतेने दिलेला ‘कौल’ मान्य : माजी खा. राजू शेट्टी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकी दरम्यान आघाडीसोबत गेल्याचा मला पाश्चाताप नसून जनतेने दिलेला कौल मान्य असल्याची भूमिका स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांडली.

लोकसभा निवडणुकीत आघाडीसोबत गेल्यामुळे तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले का या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली. तर यासह राज्यातील अनेक घडामोडीवर त्यांनी भाष्य केले.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी सोबत ज्यायचे की नाही. त्या बाबत राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन लवकरच निर्णय जाहीर केला जाईल. मात्र आमचा केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला कायम विरोध असणार आहे. त्याबाबत या पुढील काळात तीव्र लढा उभारला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतमाल नियमन मुक्त न झाल्यास सदाभाऊ खोत रस्त्यावर उतरण्याची भाषा करीत आहे. त्यावर ते म्हणाले की, शेतमाल नियमन मुक्त करण्यात यावा अशी मागणी अनेक वर्षापासुन शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. ते अगोदर त्यांनी करून दाखवावे. इकडचा पण आणि तिकडचा पण मीच असे दाखवू नका अशा शब्दात कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर सडकून टीका केली.

तसेच ते पुढे म्हणाले की, राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर सरकारने उपाय योजना कराव्यात. मात्र हे सरकार काही करताना दिसत नाही. अशा शब्दात त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.