राजीनाम्याविषयी राधाकृष्ण विखे-पाटील यांचा खुलासा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे – पाटील यांचा मुलगा सुजय यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विखे पाटीलही आता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राजीनाम्याविषयी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

राजीनामा देण्याच्या चर्चे विषयी बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की , ‘ मी अद्याप विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला नाही. माझ्या राजीनाम्याची माध्यमांनाच घाई झालीय. मी पुढच्या दोन दिवसांत माझी भूमिका स्पष्ट करेन. ‘राजीनाम्यासंदर्भात सावध आणि सूचक प्रतिक्रिया देत, राधाकृष्ण विखेंनी सस्पेन्स वाढवला आहे.

विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देणार नाही – सुजय यांना काँग्रेसकडून उमेदवारी हवी होती . आणि राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्याची त्यांची मानसिकता नव्हती . म्हणून नाइलाजास्तव त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असे स्पष्टीकरण मुलाच्या पक्षांतरानंतर विखे पाटील यांनी दिले होते . माझी भूमिका मी पक्षाचे अध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांना भेटून सांगितली आहे. मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून लगेच पदाचा राजीनामा देणार नाही. पक्ष सांगेल ती जबाबदारी मी पार पाडणार आहे, असं काल विखे-पाटील म्हणाले होते.