संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘मी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला दमसुध्दा दिलाय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मी दाऊद इब्राहिम पासून सर्वांचंच फोटोसेशन केलेलं आहे. मी दाऊदला दमसुद्धा दिला आहे असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एका वृत्तपत्राच्या पुरस्कार सोहळ्यात त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “आताचं अंडरवर्ल्ड काहीच नाही. तथापि आता अंडरवर्ल्ड राहिलाच नाही. ज्यांनी मुंबईचं त्याकाळचं अंडरवर्ल्ड पाहिलं असतं त्यांना शिकागोचं अंडरवर्ल्ड कमी वाटलं असतं. दाऊद इब्राहिम छोटा शकिल, शरद शेट्टी असेल हे सगळे लोक त्याकाळी ठरवायचे मुंबईत काय होणार, पोलीस कमीश्नर कोण होणार, मंत्रालयात कोण बसणार हे सगळं ते ठरवायचे. हाजी मस्तान जेव्हा मंत्रालयात जायचा तेव्हा पूर्ण मंत्रालय त्याला घ्यायला खाली येत होतं हे मी पाहिलं आहे. करीम लालाला भेटायला इंदिरा गांधी जायच्या. हे अंडरवर्ल्ड होतं जे आम्ही पाहिलं आहे. आता काहीच नाही. आता सगळे किरकोळ लोक आहेत.” असे ते म्हणाले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “मी दाऊद इब्राहिम पासून सर्वांचंच फोटोसेशन केलेलं आहे. दाऊदसोबत बोलले असे लोक देशात खूप कमी आहेत. मी त्याच्याशी बोललो आहे. मी त्याला दमसुद्धा दिला आहे. तो काळ वेगळा आहे. सगळे नतंर पळून गेले.” असंही त्यांनी सांगितलं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/