लष्कर ही मोदींची जहागिरी नाही, याला मी केवळ उत्तर दिले

राजीव गांधीच्या मुद्द्यावर मोदींचा राहुल गांधींवर पलटवार

नवी दिल्ली : वृत्त संस्था – लष्कर ही काही मोदींची जहागिरी नाही या प्रश्नाला मी केवळ उत्तर दिले. राजीव गांधी हा काही माझ्यासाठी मुद्दा नव्हता, असा पलटवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर केला. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मोदी यांनी हा खुलासा केला आहे.

राजीव गांधी यांची विराट यात्रा हा काही नवीन मुद्दा नव्हता. तो सर्वांना माहिती असताना हा मुद्दा कसा काय पुढे आला, असे विचारले असता मोदी म्हणाले, एका पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्षांनी म्हटले होते की, लष्कर ही काही मोदींची खासगी जहागिरी नाही. पण ही गोष्ट मिडियातून निसटली.

मग मला हे सांगावे लागेल, की वैयक्तिक स्वातंत्र्य काय आह ते. एकदा एखादी गोष्ट निघाली तर ती कोठे जाऊन थांबेल, हे तुम्ही सांगू शकत नाही. राहुल गांधी यांनी जे सांगितले. त्याला मी केवळ उत्तर देताना राजीव गांधी यांच्या विराट यात्रेचा हवाला दिला.
,राहुल गांधी यांनी मोदींची प्रतिमा नष्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे सांगितले होते, यावर बोलताना मोदी म्हणाले, नवी दिल्लीच्या खान मार्केटच्या टोळीने माझी प्रतिमा तयार केली नाही. त्यासाठी ४५ वर्षांची तपस्या केली आहे़ कोणी ती नष्ट करु शकत नाही.