मी फक्त धोनीचा शांत राहण्याचा फंडा वापरला : बटलर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पाचव्या वनडे क्रिकेट सामन्यामध्ये जॉस बटलरने आदिल राशिदसोबत 9 व्या विकेटसाठी 81 धावाची भागिदारी करत इग्लंडला विजय मिळवून दिला. बटलरने 122 चेंडूंत 110 धावांची संयमी खेळी केली. या संयमी खेळाचे श्रेय त्याने भारताचा मॅचविनर खेळाडू महेंद्रसिंह धोनी याला दिले. धोनी ने अनेकदा बिकट परिस्थितीत भारताला विजय मिळवून दिला होता, आणि त्यांची भारतीय संघातील कॅप्टन पदाची कारकिर्द यशस्वी राहिली आहे म्हणूनच जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशरच्या यादीत त्याचे नाव आहे.

[amazon_link asins=’B076H74F8N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’88414b40-7913-11e8-ab52-c1fe268a11fa’]

या सामन्यात ११० धावांची खेळी करत इंग्लडला विजय मिळवून दिल्यानंतर बटलर म्हणाला, “मी जेव्हा मैदानात होतो तेव्हा शांत कसे राहता येईल याचा विचार करत होतो. आणि त्याच बरोबर दबाव कसा कमी करता येईल याचा विचार करत असताना या परिस्थितीत नेमके धोनीने काय केले असते, असाही विचार मी केला. आणि त्यामुळेच मी शांत राहून संधी मिळताच फटकेबाजी केली.” याच दरम्यान ऑस्ट्रेलियाने इंग्लडला विजयासाठी २०६ धावांचे आव्हान करण्यात आले होते. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ११४ धावांवर ८ विकेट्स गमावल्या पण यानंतर जॉस बटलरने आदिल रशीद सोबत संयमी खेळी खेळत ८१ धावांची भागीदारी करत इंग्लडला विजय मिळवून दिला.

या विजयाबरोबर इंग्लड ने वन डे क्रिकेट मालिकेत पाकिस्तानचा ५-० ने पराभव करत इतिहास रचला .