शरद पवारांनी कॉलेजमधील गुपित सांगितलं, म्हणाले – ‘अभ्यास सोडून मी सर्व विषयात पारंगत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईमध्ये आज राष्ट्रवादीकडून युवा संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांनी युवकांशी संवाद साधला. त्यांनी तरुण पीढीसोबत संवाद साधता आला याबाबत मला आनंद होत आहे. तुमची पिढी आणि माझी पिढी यामध्ये किती फरक आहे हे मला पहायचे आहे. आता माझे वय 80 झाल असले तरी, मला प्रश्न विचारण्याची क्षमता कमी झाली नाही असे सांगताना त्यांनी तरुणांना त्यांच्या आमदारकीचा अनुभव सांगितला.

महाराष्ट्र विधानसभेत वयाच्या 26 व्या वर्षी म्हणजेच 52 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा निवडून आलो. हे सांगायचं कारण केवळ हेच आहे की, 26 व्या वर्षी देखील आपण विधानसभेत निवडून येऊ शकतो हा पर्याय तुम्हाला कळायला हवा असे त्यांनी सांगितले. या पन्नास वर्षाच्या काळात अनेक गोष्टी होऊन गेल्या. कधी सत्तेत, कधी विरोधक म्हणून अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्याची मला संधी मिळाली. या काळात नव्या पिढीशी संवाद साधण्याची संधी मिळाली की अधिक उत्साहाने काम करण्याची भावना तयार व्हायची. महाविद्यालयीन निवडणुका व्हायला पाहिजेत, अभ्यास सोडून मी सर्व विषयांत पारंगत होतो असं शरद पवार यांनी यावेळी म्हटले.

 

शैक्षणिक दृष्टीने पीएचडी प्रश्न महत्त्वाचा आहे. राज्य सरकारने ती गांभीर्याने घ्यायला हवी. वर्ष वाया जाऊ नये याला प्राधान्य दिलं पाहिजे. मी कॉलेजमध्ये असताना अभ्यास सोडून सगळ्यात भाग घ्यायचो, महाविद्यालयीन निवडणुका कशा जिंकायच्या यावर विचार करायचो. मी 22 फेब्रुवारीला निवडणूक जिंकली होती. चढत्या क्रमाने वर जाताना यशस्वी झाला तरी पाय जमिनीवर ठेवावेत असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला.

You might also like