पंढरपूर विधानसभा मतदारसंघ : समाधान आवताडे यांनी घेतली आमदारकीची शपथ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये भाजपचे उमेदवार असलेले समाधान आवताडे यांनी विजयी मिळवला आहे. तर आवताडे यांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांना तेथे पराभव पत्करावा लागला. पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांचा ३ हजार ५०३ मतांनी पराभव झाला आहे. तर समाधान आवताडे यांनी विजयानंतर आज त्यांनी मुंबईत जाऊन आपल्या आमदारकीची शपथ घेतली आहे. आवताडे यांनी पहिल्यांदाच आमदारकीची शपथ घेतली आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमधून निवडून आलेले आमदार समाधान आवताडे यांचा मुंबईत आज शपथविधी कार्यक्रम पार पडला. कोरोना महामारीमुळे सध्या मोठ्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असल्याने समाधान आवताडे यांचा शपथविधी थोडक्या लोकांमध्ये घेण्यात आला. महाराष्ट्राचे विधानसभेचे उपाध्यक्ष आणि हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी समाधान आवताडे यांना गोपनियतेची शपथ दिली आहे. या शपथविधी कार्यक्रमावेळी भाजप आमदार प्रशांत परिचारक, खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्यासह अनेक भाजपा नेते उपस्थित होते.