I-T Refund : आयकर विभागाने 15 लाख करदात्यांच्या खात्यात पाठवला 24,792 कोटींचा परतावा, ‘या’ पध्दतीनं तपासा मिळालाय की नाही

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आयकर विभागाने 17 मेपर्यंत 15 लाखांपेक्षा अधिक करदात्यांना 24, 792 कोटी रुपयांचा परतावा दिल्याची माहिती बुधवारी (दि. 19) ट्विटरद्वारे दिली आहे. तर 1498 लाख प्रकरणात 7458 कोटी रुपयांचा व्यक्तीगत इन्कम टॅक्स रिफंड केला आहे. तर दुसरीकडे 43, 611 प्रकरणात 17.334 कोटी रुपयांचा कंपनी रिफंड जारी केला आहे. परंतु विभागाने या रिफंडचे आर्थिक वर्ष मात्र स्पष्ट केले नाही. परंतु हा रिफंड आर्थिक वर्ष 2019-20 साठी दाखल केलेल्या टॅक्स रिटर्नसाठी असल्याचे मानले जात आहे.

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च रोजी संपलेल्या 2020-21 या आर्थिक वर्षादरम्यान विभागाने 2.38 कोटी करदात्यांना 2.62 लाख कोटी रुपयांचे रिफंड जारी केले आहेत. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जारी केलेले रिफंड आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये जारी 1.83 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 43.2 टक्के अधिक आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केल्यानंतर त्याच्या व्हेरिफिकेशननंतर ते ज्यावेळी पाठवले जाते. त्यावेळी इन्कम टॅक्स विभाग त्याची पडताळणी करण्यास सुरूवात करतो. जर तुमचा क्लेम स्वीकार झाला तर त्यानंतर रिफंड अमाऊंट थेट तुमच्या बँक खात्यात किंवा चेकद्वारे परत केली जाते. परंतु आयटीआर प्रोसेसिंगसाठी काही वेळ लागतो.

असे करा स्टेटस चेक
तुमचे स्टेटस चेक करण्यासाठी पुढील प्रोसेस करणे आवश्यक आहे. आयकर विभागाच्या वेबसाईटवर दिलेल्या डॅशबोर्ड ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर व्ह्यू रिटर्न अँड फॉर्मवर क्लिक करा. त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्नच्या पेजवर जाण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न यावर क्लिक करा. इन्कम टॅक्स रिटर्नच्या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा ITR प्रोसेस झाला आहे. का किंवा व्हेरिफिकेशनसाठी पेंडिंग आहे का हे दाखवेल. जर तुमचा आयटीआर व्हेरिफाय झालेला दाखवत नसेल तर तुम्ही तुमच्या आधार कार्डाच्या मदतीने तो पुन्हा व्हेरिफाय करण्यासाठी रिक्वेस्ट करू शकता. तसेच तुम्ही सही केलेला ITR-V फॉर्म केवळ भारतीय पोस्ट ऑफिसच्या सामान्य पोस्ट किंवा स्पीड पोस्ट सेवेद्वारे इन्कम टॅक्स सीपीसी ऑफिसमध्ये पाठवू शकता. जोवर तुम्हाला त्या ठिकाणी सक्सेसफुली व्हेरिफाईड असे लिहलेले येत नाही. तोपर्यंत तुम्हाला रिफंड मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. जर आयटीआर प्रोसेस झाला नसेल तर करदाता CPC अथवा अ‍ॅक्सेसिंग अधिका-याकडे आपली तक्रार दाखल करू शकता.