अजित पवारांनी ‘मुख्यमंत्री’ व्हावे, शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या बड्या नेत्याचे ‘मत’

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या अमोल कोल्हे यांनी मोठे विधान केले आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री व्हावे, ही राज्यातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, मला वाटते अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, मात्र मला वाटून काय होणार. पक्षाचे सर्व निर्णय पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार घेतात. त्यांचा निर्णय माझ्यासह कार्यकर्त्यांना मान्य आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राला आज भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाणीपुरवठ्याचा आढावा घेऊन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक दत्ता साने यावेळी उपस्थित होते.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले, पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या नियोजनातील चुका, यामध्ये काय अडचणी आहेत इत्यादींची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना आणि धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसताना देखील शहराला दररोज पाणी पुरवठा केला. मात्र, आता पाणी कपात का होत आहे, असा प्रश्न करत त्यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/