काय सांगता ! होय, पहिल्या रात्री ‘रक्त’ दाखविण्यासाठी अमेझॉनवर विकली जातेय ‘फेक’ व्हर्जिनिटी ‘कॅप्सूल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ऑनलाईन शॉपिंग कंपनी अमेझॉनवर अशी कॅप्सूल विकली जाताना दिसत आहे आणि ज्यात असा दावा केला जात आहे की, पहिल्या रात्री व्हर्जिनिटी दाखवण्यासाठी आणि नकली रक्त काढण्यासाठी महिला या कॅप्सूलचा वापर करू शकतात. या गोळीला घेऊन लोकांच्या प्रतिक्रियाही येताना दिसत आहे.
I Capsule
आय व्हर्जिन असं या गोळीचं नाव आहे. असं सांगितलं जात आहे की, ही गोळी पहिल्या रात्री नकली रक्त दाखवण्यासाठी आहे, जी महिलांची व्हर्जिनिटी दाखवेल. सोबतच या कॅप्सूलची डिटेल माहिती देण्यात आली आहे. दावा केला जात आहे की, ही कॅप्सूल म्हणजे हाय क्वालिटी ब्लड पावडर आहे. पहिल्या रात्री नकली रक्त दाखवण्यासाठी आहे. याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत असंही सांगण्यात आलं आहे. ही कॅप्सूल सहज, सुरक्षित आणि सुविधापूर्ण असल्याचं म्हटलं जात आहे. याशिवाय कॅप्सूलची किंमतही देण्यात आली आहे.

सोशल मीडियावर या कॅप्सूलवर अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अनेकांनी यावर टीका केली आहे. आजही महिलांना आपली व्हर्जिनिटी सिद्ध करावी लागते. काही युजर याला घेऊन खुश झाले आहेत. त्यांना तर विश्वासच बसत नाही की, अशीही कॅप्सूल मार्केटमध्ये आहे.
Sex
एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की, व्हर्जिनिटी गमावण्याची अनेक कारणे असतात. यात खेळाचाही समावेश आहे. असे असतानाही भारतीय पुरुष आपल्या पार्टनरच्या व्हर्जिनिटीला घेऊन गंभीर असल्याचं दिसत आहे. देशात अनेक ठिकाणं अशी आहेत की, महिलांना व्हर्जिनिटी टेस्ट देण्यास भाग पाडलं जातं. महाराष्ट्रातील काही समुदायांत ही परंपरा आजही आहे.

Visit : Policenama.com