देशाला T-20 विश्वचषक जिंकवून द्यायचाय : रोहित शर्मा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोनाचा फटका जगभरातील क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. त्यामुळे बीसीसीआयने सर्व महत्वाच्या क्रीडा स्पर्धा रद्द केल्या आहेत. लॉकडाउन काळात भारतीय खेळाडू आपल्या घरात राहून परिवारासोहत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-20 विश्वचषकाचे आयोजनही यंदा कोरोनामुळे धोक्यात आहे. विशेष मुलाखतीत रोहित शर्माने आपल्याला भारताला टी-20 विश्वचषक जिंकवून द्यायचा आहे, अशी भावना व्यक्त केली आहे.

देशासाठी टी-20 विश्वचषक जिंकण आमच्या सर्वांसाठी एका स्वप्नासारखे आहे. प्रत्येक वेळी तुम्ही स्पर्धेसाठी जाता तेव्हा प्रत्येक सामना तुम्हाला जिंकायचा असतो. विश्वचषकाची गोष्ट वेगळी असते. मला भारतासाठी विश्वचषक जिंकायचा आहे. यंदाचा टी-20 विश्वचषक खेळवला जाईल की नाही मला माहिती नाही. पण खेळवला गेल्यास त्यासाठी सराव करायला वेळ मिळेल का हा देखील एक प्रश्नच आहे. 2020 वर्षात भारतीय संघाच्या पहिल्या परदेश दौर्‍यात रोहित शर्मा सहभागी झाला होता. न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. रोहित शर्मानेही या मालिकेत छाप पाडली. अखेरच्या टी-20 सामन्यात रोहित दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला संघातलं स्थान गमवावे लागले होते.