पुढील पाच वर्षांसाठीही मीच मुख्यमंत्री : फडणवीस

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे येथील उत्पादन थेट जवाहरलाल नेहरु पोर्टवर जाणार असून चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे भविष्यात येथील उद्योगांना चांगले दिवस येतील. वीज दरवाढीबाबत विदर्भ व मराठवाड्यातील उद्योजकांनी चिंता करू नये. पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होणार असल्याने  सरकार तुमच्या पाठीशी कायम राहणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे दिली.

[amazon_link asins=’B0148OLZNO,B00K6DHF0O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’04262707-b963-11e8-be58-314be772cac0′]

विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन स्थापना दिन आणि व्हीआयए-सोलर विदर्भ उद्योग गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नागपुरातील हॉटेल सेंटर पॉइंट येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, उद्योजक सत्यनाराण नुवाल, नितीन खारा उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे येथील उत्पादन थेट जवाहरलाल नेहरु पोर्टवर जाणार असून चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. केवळ १९ महिन्यांत भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरात लवकर हा महामार्ग पूर्ण होणार आहे. गुजरात, कर्नाटक, दिल्लीसारख्या राज्यांना मागे टाकत महाराष्ट्राने उद्योगक्षेत्रात प्रगती गाठली आहे. आज एकूण विदेशी गुंतवणुकीतील ४७ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. पण अद्यापही काही मागास भागांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असून संतुलित उद्योजक धोरण राबविण्याची गरज आहे. अमरावती येथील टेक्सटाइल्स पार्कने गती धरली असून भविष्यात ३० मोठे प्रकल्प तिथे येणार आहेत.

बँकांनीच बुडविला १०० कोटींचा जीएसटी

यावेळी अतुल पांडे यांनी वाशिम, गडचिरोलीसारख्या नॉन इंडस्ट्रीअल झोनला विकसित करण्याची मागणी केली. तर सत्यनारायण नुवाल यांनी भारतातील उद्योगसंपन्न राज्य निर्माण करण्याची क्षमता विदर्भ उद्योजकांमध्ये असल्याचे गौरवोद्गार काढले.