… तर ‘मी पुन्हा येईन’, फडणवीसांकडून घोषणेचा पुन्हा ‘पुनरूच्चार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माझा डीएनए हा विरोधी पक्षाचा आहे, त्यामुळे आता विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी नीट पार पाडू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसेच आमच्या मित्रपक्षाने सत्तेसाठी विरोधी पक्षाशी हातमिळवणी केली आणि सरकार स्थापन केले त्यामुळे आता आम्ही विरोधी पक्षाची जबाबदारी सांभाळणार आहोत, मात्र पक्षश्रेष्ठींनी ठरवलं तर मी पुन्हा येइन असे देखील फडणवीस म्हणाले.

पुन्हा निवडणूक आल्या तर त्यांना सामोरं जायची आमची तयारी आहे. तसेच पक्षश्रेष्ठींनी ठरवलं तर मी पुन्हा येइन असे देखील सांगायला फडणवीस विसरले नाही. सध्या विरोधी पक्षाची जबाबदारी आल्याने ती व्यवस्थित सांभाळू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी विरोधकांशी हातमिळवणी केली याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, आम्ही लोकसभा सोबत लढलो त्यामुळे विधानसभेला वेगळे लढणे योग्य होणार नाही म्हणून दिल्लीतील नेतृत्वाने विधानसभा देखील युतीत लढा असे आदेश दिले होते, त्याप्रमाणे आम्ही युतीत लढलो. मात्र शिवसेनेने विरोधकांना सोबत घेत सत्तास्थापना केली आणि जनतेचा विश्वासघात केला अशा शब्दात फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

Loading...
You might also like