उमेदवारीवरून माघार घेतलीच नाही -अर्जुन खोतकर 

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीतून मी अद्याप माघार घेतली नाही. मी आगामी दोन दिवसात माझी भूमिका जाहीर करणार आहे. आपण शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून आपला निर्णय जाहीर करणार आहे असे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हणले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला उद्या जालन्यात थांबायला लावले आहे. त्यांच्याशी मी उद्या भेटणार आहे आणि माझी भूमिका मी त्यांना सांगणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमके काय आहे हे मला माहित नाही. परंतु ते माझ्या मंत्रिमंडळाचे नेते असल्याने मी त्यांचा आदेश मान्य करून जालन्यात त्यांची भेट घेणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना हि मी भेटून विचार विनिमय करणार आहे. त्यानंतर येत्या दोन दिवसात माझ्या उमेदवारी बद्दल निणर्य जाहीर करणारा आहे असे अर्जुन खोतकर म्हणाले आहेत.

अर्जुन खोतकर हे मॅनेज झाले आहेत अशी मतमतांतरे जालन्याच्या राजकारणात रंगात आली आहेत त्यावर खोतकरांना विचारले असता त्यांनी या चर्चांना काहीच अर्थ नाही असे म्हणले आहे. तर आपल्याला पडायला सगळे चोट्टे एकत्र झाले आहेत असे रावसाहेब दानवे यांनी खोतकरांचे नाव नघेता टीका केली आहे.त्यामुळे दानवे-खोतकर यांच्यात असणारा विस्तव क्षमण्याचे नाव घेत नाही असे चित्र सध्या दिसते आहे.