‘मंत्रिपद’ ! संधी मिळाल्यास ‘सोनं’ करू, रोहित पवारांनी सांगितलं

कर्जत-जामखेड : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला एक महिला होत आला तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यामुळे इच्छुकांची चांगलीच धाकधूक वाढली आहे. मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सध्या जोरदार सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्रिपदाची संधी मिळाल्यास संधी करून असे विधान करून आपणही मंत्रिपदासाठी इच्छूक असल्याचे संकेत दिले आहेत.

मंत्रिमंडळात संधी द्यायची की नाही, हा निर्णय पक्षाचा आहे. मात्र संधी मिळाल्यास सोनं करू असं रोहित पवार यांनी म्हटलं. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळे रोहित पवारांना देखील मंत्रीपद दिल्यास एकाच घरात दोन मंत्रिपदं जाऊ शकतात. त्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील कामांसाठी बैठकीचं आयोजन केले होते. यावेळी त्यांनी मतदारसंघातल्या विविध समश्यांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर त्यांनी काही प्रश्नांची उत्तर दिली.

मंत्रिपदाची अप्रत्यक्ष इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखवली. त्यांनी मंत्रिमंडळात संधी दिली तर सोनं करेन, अशी इच्छा बोलून दाखवली. काम करणाऱ्याला संधी मिळायला हवी, अशी लोकांची इच्छा असते. बोलणारे बोलतच असतात. मी कसलीही अपेक्षा न ठेवता काम करत आहे. मंत्रिपदासारखी जबाबदारी असल्यास ती स्वीकारावी लागेल. असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/