पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल : गिरीश बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्षांमधील हालचालींना वेग आला आहे. पुणे लोकसभा मतदार संघात खासदार अनिल शिरोळे आणि गिरीश बापट यांच्यापैकी कोणाला तिकीट मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल अशी प्रतिक्रिया अन्न आणि नागरी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी आता जवळपास निश्चित झाली आहे . मात्र, पुणे लोकसभा मतदार संघात खासदार अनिल शिरोळे आणि गिरीश बापट ही दोन नावे समोर आली असली तरी , लोकसभेचं तिकीट बापटांनाच मिळेल अशी चर्चा आहे . त्यावर बोलताना बापट म्हणाले की , मी भाजपचा कार्यकर्ता आहे. आमच्या सगळ्यांवर संस्कार असतात . पक्ष योग्य तो निर्णय घेत असतो. निवडणूक तारीख जाहीर झाली की पक्ष उमेदवाराचं नाव जाहीर करतो. त्यामुळे पक्षकडून जो उमेदवार जाहीर होईल तोच आमचा उमेदवार असेल. आम्ही सगळेच मिळून त्याच काम करू. ‘

तुम्हाला खासदार होण्याची इच्छा आहे का ? कारण तुम्ही दिल्लीत जावं अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे …! यावर प्रतिक्रिया देताना  बापट म्हणाले की , ‘ मी कुठे जावं हे माझ्या नाही तर पक्षाच्या इच्छेवर अवलंबून असत. माझं कार्यकर्त्यांवर प्रेम आहे. मी कुठेही गेलो तरी मी हक्काचाच माणूस आहे. शेवटी पक्षाचा निर्णय शिरसंवाद्य असतो आणि तो मानणारा मी आहे. ‘

बापटांना उमेदवारी की केवळ समन्वयकाचे काम ? – पुणे, बारामती, शिरूर ,सोलपूर माढा, मावळ (रायगडमधील तीन विधानसभा वगळून ) या लोकसभा मतदार संघांची भाजप – सेना समन्वय अधिक दृढ करण्याची जबाबदारी भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट यांना देण्यात आली आहे . तर शिवसेनेकडून डॉ. नीलम गोऱ्हे यांना देण्यात आली आहे. आता गिरीश बापट यांची निवड दोन्ही पक्षातील समन्वय अधिक दृढ होण्याच्या दृष्टीने करण्यात आली असेल तर मग त्यांच्या उमदवारीचे काय ? की पुण्यातून उमेदवारी आणि समन्वयकाचे काम दोन्ही पालकमंत्र्यांनाच करावे लागेल ? की त्यांना उमेदवारी देण्यात येणार नाही ? याबाबत उलट-सुलट चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.