ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती मिळवून देणारच : विश्वासराव आरोटे

दौंड : पाेलीसनामा ऑनलाईन

अब्बास शेख

ग्रामीण भागातील पत्रकारांना शासनाच्या योजना अधिस्वीकृती ओळखपत्र नसल्यामुळे या योजना मिळवुन देण्यासाठी राज्य मराठी पत्रकार संघाचा लढा शेवटच्या क्षणापर्यंत चालु राहील ,संघटना ही सर्वांची मातृसंस्था असुन गल्ली पासुन ते दिल्ली पर्यंतच्या पत्रकारांना आधार देणारी संस्था आहे.पत्रकारांना भयमुक्त पत्रकारिता करता यावी त्यांच्या लेखणीवर गदा आणुन पाहणारांची आम्ही गय करणार नाही असे मनोगत विश्ववासराव आरोटे यांनी ब्रम्हपुरीतील अधिवेशनात व्यक्त केले तर माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बोलताना मला घडविण्यात पञकाराचा मोठा वाटा आहे “मी अनेक संघर्षाला तोंड देत पुढे आलो, खरंतर एक पञकार म्हणूनच माझ्या सामाजिक जीवनाची सुरवात झाली. सकाळी उठल्यानंतर माझ्या हातून कुणाचे वाईट होऊ नये, अशी मी प्रार्थना करतो. पञकार हा समाजाचा खरा समाजसेवक असून आजही जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f9415188-c8a0-11e8-b9ba-71f83d5728b0′]

माध्यम बदलली असतील परंतु जो पञकार खरे स्पंदन टीपतो त्याचा धाक आजही समाजात आहे. राजकारण्यांवर किंवा एकंदरित व्यवस्थेवर अंकुश ठेवण्याचं काम पञकारिता करते, मला घडविण्यात व आकारऊकाराला आणण्यास पञकारांचा सिंहाचा वाटा राहिला आहे” असे आमदार विजयभाऊ वडेट्टीवारांनी ब्रह्मपुरीत संपन्न झालेल्या विदर्भस्तरीय पञकारांच्या अधिवेशनात आपली स्पटोक्ती दिली.ते अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून बोलत होते.

विचारपीठावर अध्यक्षपदी म. रा. म .पञकार संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे तर उद्घाटक म्हणून ‘महाराष्ट्र टाइम्स ‘ संपादक श्रीपाद अपराजित उपस्थित होते. प्रमुखअतिथीमध्ये प्राचार्य भाऊसाहेब जगनाडे , निलेश सोमाणी, डॉ खोडे, जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर, पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा महेश पानसे इ. मान्यवरांची उपस्थिती होती.
[amazon_link asins=’B01N74LA6J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0109f62c-c8a1-11e8-933e-0fea3cb0308d’]

यावेळी प्रथम अहवाल सालात संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष डी एम जगताप ,सुर्यभान सहाणे,लक्ष्मीबाई मुंढे यांना आदरांजली वाहुन अधिवेशनास प्रारंभ झाला तर यावेळी दिवंगत पत्रकार डी एम जगताप यांना ५१ हजार रु पत्रकार अधिवेशनात जाहीर केली .आरोटे यांनी पत्रकारांनी गटतट बाजूला ठेवुन वेळप्रंगी एकत्रितपणे आलो तर नक्कीच आपण १८ मागण्या सरकारकडुन मंजुर करू मात्र पत्रकारांना शिवशाही बसमध्ये प्रवास मोफत मिळाला तरी याचा फायदा सर्वांना मिळावा ,अधिस्वीकृती धारक पत्रकार राज्यात 2880 असुन सर्व योजना त्यांनाच मिळतात शासनाला सहकार्य करणारे ग्रामीण भांगातील पत्रकार आहे.

आज देशातील न्यायधिशांना न्याय मागण्यांसाठी पत्रकार परीषद घ्यावी लागली देश व राज्यात पत्रकार महत्त्वाचे काम करतात मात्र शासनाने वर्तमापत्रांची देखिल मुस्कटदाबी सुरू केली आहे नवीन अध्यादेश काढुन वर्तमापत्रे व साप्ताहिके बंद करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी 15 आँगस्टला निवेदने देवुन हरकती नोंदविल्या असल्या तरी शासनाने ग्रामीण भांगातील दैनिके व साप्ताहिके बाबत योग्य निर्णय घ्यावा ,अधिवेशन घेवुन संघाने आपल्या मागण्या शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर पत्रकार संरक्षण कायदा ,कै बाळशास्त्री जांभेकर पेन्शन सन्मान योजना, पत्रकारांना शिवशाही मध्ये प्रवास या ती मागण्या मंजुर करण्यात यश्सवी बनलो तरी 18 मागण्या प्रलंबित असुन लढा गतिमान करून सर्व मागण्या मंजुरीसाठी शेवटपर्यत सरकारकडे गांधीमय आंदोलन करुण लढा देणार असल्याचे आरोटे यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B078M16N8P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’07451e0f-c8a1-11e8-9570-37b94320f36a’]

तर की, ” पञकारांनी आज बदलेली अवस्था पाहून आपण बदलायला हवे. ब्रह्मपुरीने मला घडविले, मी संपादक झालो पण ‘वाघ आणि मानव’ हा संघर्ष या तालुक्यात उभा आहे तर मी भूतदया मनी ठेवून मानवाच्या बाजूने उभा राहिन! ” याप्रसंगी ब्रह्मपुरीचे ठाणेदार दीपक खोब्रागडे यांचा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सत्कार केल्या गेला. याशिवाय महाराष्ट्रतून आलेले संघटनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष संदिप पांडव ,अमरावती जिल्हा अध्यक्ष नयन मोंढे ,नागपुर जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सोनारकर ,गडचिरोली जिल्हा अध्यक्ष रुपेश वाकोडे ,ग्रामीण जिल्हा अध्यक्ष इरफान पठाण ,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाजीराव फराकटे ,वाशिम जिल्हा अध्यक्ष निनाद देशमुख ,ग्रामीण जिल्हा अध्यक्ष नितीन हजारे ,भंडारा जिल्हाअध्यक्ष अजय मेश्राम ,गोदिंया जिल्हा अध्यक्ष दतात्रय दलाल ,यवतमाळ जिल्हा अध्यक्ष राजु इंगोले ,बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सुभाष लहाने , सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांना स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या सञाचे सूञबध्द संचालन प्राचार्य, डॉ क्रिष्णा राऊत तर आभार संघाचे तालुकाध्यक्ष डॉ रवी रणदिवेंनी केले.

अधिवेशनाच्या दुस-या सञात प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी कॅबिनेट मंञी शोभाताई फडणवीस, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे ,मूलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, ब्रह्मपुरीच्या नगराध्यक्षा योगीता बनपुरकर उपस्थित होत्या. शोभाताईं फडणवीसांनी यावेळी, ” पञकार हा मोठा समाजातील घटक असून आजच्या विविध माध्यमांतून तो माहिती जगाला पूरवितो. प्रिन्ट मीडियामुळे ज्ञान आपल्याला मिळते. त्यातील संपादकीय लेख आपल्याशी बोलून जातात “असे अभ्यासपूर्ण विवेचन मांडले तर देवराव भोंगळेनी ,आमचे आणि पञकारांचे बहूतेक नाते कधी छत्तीशचे तर कधी चांगलेही असते. त्यांच्या संवर्धनासाठी आपल्या शासनाने सुविधा केल्यात त्याचा लाभ त्याने घ्यावा व आपली पञकारिता फुलवावी “असे मत मांडले. या सञाचे संचालन डॉ धनराज खानोरकरांनी तर आभार डॉ रवी रणदिवेंनी मानले.
[amazon_link asins=’B079Q64PW6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’11580151-c8a1-11e8-ad76-e573c383ea19′]

कार्यक्रमाला महाराष्ट्रातून बहुसंख्येने पञकार आले होते. ब्रह्मपुरीच्या ‘लोढीया सेलिब्रेशन हाॅल’मध्ये हे अधिवेशन रंगले या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी संघाचे बाळासाहेब देशमुख ,अमरावती विभाग प्रमुख निलेश सोमणी ,जिल्हाध्यक्ष प्रा महेश पानसे, कार्याध्यक्ष सुनिल बोकडे, संघटक राजू कुकडे, महासचिव जितूभाऊ चोरडीया, ब्रह्मपुरीचे तालुकाध्यक्ष डॉ रवी रणदिवे, जिल्हा सदस्य डॉ धनराज खानोरकर ,सचिव गुरुदेव अलोणे, कार्याध्यक्ष प्रा श्याम करंबे, संघटक, अरविंद चुनारकर, उपाध्यक्ष विनोद चौधरी,नंदू गुड्डेवार, कोषाध्यक्ष संजय बिंजवे, सहसचिव रवी शेंडे, सदस्य शिवराज मालवी, अमर गाडगे, अमरदीप लोखंडे,राहूल मैंद,मधुकर मेश्राम,जिल्हा उपाध्यक्ष अशिष घुमे , गोवर्धन दोनाडकर, अनिल कांबळे, प्रा संजय लांबे, गुरुदेव वाघरेंनी परिश्रम घेतले.

पुण्यात अनधिकृत फ्लेक्स कोसळल्याने ३ ठार ७ जखमी