मोदींकडून लातूरकरांना पाण्यासह ‘हे’ प्रश्न सोडविण्याचं आश्वासन

वेगळ्या जलशक्ती मंत्रालयसह तुळजापूरला रेल्वे

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी औसा येथे लातूरकरांना मोठमोठी आश्वासनं दिली आहेत. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वेगळं जलशक्ती मंत्रालय, तुळजापूरला रेल्वे दिली जाईल, शेतकऱ्यांना व छोट्या दुकानदारांना पेन्शन, यासह काल प्रकाशित केलेल्या संकल्प पत्रातील संकल्प पुर्ण करण्याचे आश्वासन दिले. तर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना देशहिताचा विचार करून एनडीएला मतदान करण्याचे भावनिक आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉंग्रेसवर देशविरोधी असल्याचा आरोप करत जनतेला त्यांना धडा शिकविण्याची इच्छा व्यक्त केली. तर देशातील पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. पुढे भांडणं होतील ती पाण्यासाठी. त्यामुळे देशातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वेगळं जलमंत्रालय आम्ही सत्तेत आल्यावर सुरु करण्याची घोषणा केली. पाण्याची लातूरचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. लातूरसाठी पाण्याची रेल्वे पोहोचली ती जगाने पाहिली. परंतु जलशिवारचा फायदा येथे झाला आहे. असं ते म्हणाले.

भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

– छत्रपती शिवाजी महाराज एक महान प्रशासक

– २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प केला आहे.

– प्रधानमंत्री किसान सन्मान निधीद्वारे लघु क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना मदत केली आहे.

– देशातील शेतीसाठी पैशांचा प्रश्न सुटावा यासाठी किसान क्रेडिट कार्डमधून १ लाख रुपयांना विना व्याज कर्ज मिळेल. याचीं घोषणा काल केली.

– निवडणूकीनंतर येणारं एनडीए सरकार ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन

– चौकीदाराची भीती सर्वांनाच

– त्यामुळेच नोटांचे बंडल सापडत आहेत.

– विरोधकांना वीर जवानांवर विश्वास नाही.

– सर्व घऱात वीज, पाणी यांच्या सोई देणार

– बंडल ठेवणारे चौकीदाराला घाबरत आहेत.

– कॉ्ग्रेस आतापर्यंत खोटी आश्वासनं देत आलं आहे.

– मतांसाठी देशाच्या सुरक्षेकडे डौळेझाक