इंदापूर तालुक्यातील जनतेचे उपकार मी कधीच नाही विसरणार : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – २०१९च्या विधानसभेच्या निवडणूक प्रचाराच्या वेळी इंदापूर तालुक्यातील १४६ गावापैकी फक्त १२ गावात मी प्रचार सभा घेतल्या. तरीही इंदापूर तालुक्यातील सुज्ञ जनतेने मला भरघोस मतांनी निवडून दीले व माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील जनतेचे उपकार मी माझ्या आयुष्यात कधीच फेडू शकणार नसल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे नागरी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.

दत्तात्रय भरणे यांची महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम, मृृृदा, जलसंधारण, वने पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय, मत्स्यव्यवसाय व सामान्य प्रशासन राज्यमंत्री पदी निवड झाल्याने त्यांचा इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर नागरी सत्कार सोहळा आयोजन करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना दत्तात्रय भरणे बोलत होते. तर इंदापूर तालुक्यातील मौजे शेळगावचे सुपुत्र यशवंत माने यांची मोहळ विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवड झाल्याबद्दल इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने त्यांचाही नागरी सत्कार राष्ट्रवादीचे पूणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
Indapur

पुढे बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की नुसती आश्वासने देणे हा माझा स्वभाव नाही तर अगोदर मी जनतेची कामे करायची व नंतर बोलुन दाखवायचे असा माझा स्वभाव आहे. परंतु इतरांसारखा भपकेबाज शो मी कधीच करणार नाही. जी माणसं सर्वसामान्यांची काम करतात तीच माणसं आपली असतात. इंदापूर तालुक्याला ‘शो’च काम आवडत नाही.

काही जणांनी मागील सहा महीन्यापूर्वी पाण्याचा शो केला होता. इंदापूर तालुक्यातील २२ गावाचे पाणी इथुन पुढे कोण घेवुन जातोय तेच मी पाहणार असुन काही जणांना बाॅडीगार्ड घेवुन फिरण्याची सवय आहे. परंतु मला बाॅडीगार्डची अजिबात गरज नाही. कारण तालुक्यातील जनताच माझी बाॅडीगार्ड असल्याने मला सरकारी बाॅडीगार्डची गरज नसल्याचे सांगत हर्षवर्धन पाटील यांना टोला मारला. इंदापूर तालुक्यातील जनतेचे आभार मानले.

राष्ट्रवादीचे प्रदीप गारटकर यांनी प्रस्ताविक करताना म्हणाले की माणसे इतिहास घडवत असतात. इंदापूर तालूक्यातील सामान्य माणूस राज्यमंत्री बनला तर दुसरा आमदार झाला. सामान्य नागरीकांच्या सहकार्यामुळे हे घडले. काही मुठभर पुढारी सोडले तर संपूर्ण तालुक्याला आनंद असल्याचे सांगताच नागरीकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

मोहोळचे आमदार व इंदापूर तालुक्यातील शेळगावचे सुपुत्र यशवंत माने सत्काराला उत्तर देताना म्हणाले की इंदापूर तालुक्यातील जनतेची जशी अपेक्षा आहे तशी अपेक्षा यशवंत मानेंची आपल्याकडून असुन मोहोळ मतदार संघासाठी चांगला निधी ऊपलब्ध करून देण्याची मागणी मंत्री दत्तात्रय भरणे यांचेकडे करून इंदापूरातील जनतेने सत्कार केल्याने मी भारावुन गेल्याचे यशवंत माने म्हणाले. यावेळी प्रदीप गारटकर, दशरथ माने, प्रविण माने, महारूद्र पाटील, बाशाभाई शेख, अमोल भिसे, गणेश झगडे, सचिन सपकळ, अ‍ॅड. शुभम निंबाळकर, अरबाज शेख यांचेसह तालुक्यातुन मोठ्याप्रमाणात नागरिक व महिला उपस्थित होत्या.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/