‘ते’ गूढ कायम गुलदस्त्यातच राहणार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन सत्तास्थापन केल्याच्या प्रयत्नावर अजित पवारांनी सूचक वक्तव्य केलं. मी माझं गूढ कधीही उकलणार नाही, मला बंधन घालून नका असे म्हणत अजित पवारांनी त्या घटनेमागचं कारण देणं टाळलं. राज्यात भाजपकडून 80 तासातच सरकार कोसळल्यानंतर मी योग्य वेळी भाजप बरोबर का गेलो याचं उत्तर देईल असं म्हणलं होतं. परंतू यानंतर त्यांनी अजूनही यावर अबोला कायम ठेवला आहे.

आता भाजप शिवसेनेना अप्रत्यक्ष सत्तास्थापनेची ऑफर देत आहे यावर बोलताना अजित पवार म्हणाले की कोणी कोणाला ऑफर द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे, परंतू आता महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झालं आहे.

अजित पवार म्हणाले की राष्ट्रवादी आणि काँग्रेसची विचारधारा साधारण सारखीच आहे. शिवसेनेचे विचारधारा वेगळी आहे सर्वांना माहित आहे. परंतू राज्यात ज्या परिस्थिती महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाली हे ही सर्वांना माहित आहे. जेव्हा असं कोअ‍ॅलिशनच सरकार असतं तेव्हा मतमतांतर तर असतंच. ते विषय मागे ठेवाचये. ज्यात जनतेचं हित आहे, ज्यात राज्याच हित आहे त्याला अग्रक्रम द्यायचा. यावेळी ते पुण्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

पवारांनी स्पष्ट केले की विकासकामं मार्गी लावण्यासाठी अर्थ खातं राष्ट्रवादीकडे ठेवेलं. राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एखादं खातं मिळू शकतं. थोडं थांबा असंही ते म्हणाले. तिन्ही पक्षातील वाद टळले तर राज्यातील सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वास देखील पवारांना व्यक्त केला.

फडणवीसांना मी पणाचा फटका बसल्याचं सांगत अजित पवार म्हणाले की पवार साहेबांच्या सातारच्या सभेने हवा झाली आणि ईडीने वातावरण बदलले. बारामतीकरांनी आपल्याला दीड लाख मतांची आघाडी दिली, त्याबाबत मी बारामतीकरांचे कौतुक करतो.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/