…तर लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार नाही : उदयनराजे

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात खसदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश करणारे साताराचे खासदार उदयनराजे यांच्यावर राष्ट्रवादी कडून टीका होत आहे. या टीकेला उत्तर देताना उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना आव्हान दिले आहे. शरद पवार जर सातारामधून लोकसभेसाठी उभे राहिले तर आपण लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे उदयराजे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शरद पवार यांच्याबद्दल मला नितांत आदर होता, आहे आणि राहिल असे त्यांनी सांगितले.

खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे यांनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणुक घेण्याची अट घाटली होती. शनिवारी राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. मात्र, त्यावेळी सातारा लोकसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली नाही. आज (सोमवार) निवडणूक आयोगाने सातारा पोटनिवडणुकीची घोषणा केली असून साताऱ्यातील पोटनिवडणुकीत उदयनराजे पुन्हा बाजी मारणार का याकेड सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, उदयनराजे भोसले यांच्या विरोधात स्वत: शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवारांबद्दल कालही आदर होता. आजही आहे आणि उद्याही राहिल. आज महाळ आहे. पूर्वजांची आठवण काढण्याचा दिवस आहे. पवार हे मला वडिलधाऱ्यांच्या स्थानी आहे. ते निवडणुकीला उभे राहमार असतील तर मी लढणार नाही. अर्ज भरणार नाही. पण मला दिल्लीतील बंगला आणि गाडीसाठी मुभा द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Visit : policenama.com