‘तान्हाजी’ : थिएटरमध्ये जाऊनही CM ठाकरे म्हणाले – ‘सिनेमा पाहणार नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बॉलिवूड स्टार अजय देवगणसोबत थिएटरमध्ये जाऊन तान्हाजी सिनेमा पाहतील अशी माहिती होती. यासाठी प्लाझा या थिएटरमध्ये खास शोचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु प्लाझामध्ये जाऊनही उद्धव ठाकरेंनी तान्हाजी सिनेमा पाहिला नाही. खुद्द सीएम ठाकरेंनीच यावर भाष्य केलं आहे.

सिनेमा पाहणार की नाही याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “तान्हाजी: द अनसंग वॉरियर हा सिनेमा मी पाहणार असल्याच्या बातम्या आल्या. मात्र आज मी हा सिनेमा पाहणार नाही. मंत्रिमंडळासोबत मी हा सिनेमा नक्की बघेन.” असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. आहे. म्हणजे उद्धव ठाकरे तान्हाजी सिनेमा पाहणार आहेत हे मात्र नक्की आहे.

शहरातील नैसर्गिक वारसा आणि त्याचे महत्त्व सांगणाऱ्या वाईल्ड मुंबई या व्हिडीओचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या उपक्रमाचं कौतकही केलं. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “वेळ घ्या मात्र मुंबईचं वैभव जगभरात पोहोचवा” असं म्हणत त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिलं.

अजय देवगणच्या तान्हाजी: द अनसंय वॉरियर या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा 10 जानेवारील रोजी रिलीज झाला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहेत. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. सिनेमानं 150 कोटींचा आकडाही सहज पार केला आहे. अजून या सिनेमाची कमाई थांबायचं नाव घेत नाहीये. अजूनही सिनेमाची कमाई सुरूच आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  

 

You might also like