वेळ पडल्यास मी सतरंज्या देखील उचलणार : उर्मिला मातोंडकर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मी शिवसेनेत लोकांची कामे करण्यासाठी आली आहे. वेळ पडल्यास मी सतरंज्या उचलण्यासही तयार आहे, असे वक्तव्य मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी मंगळवारी (दि. 1) केले आहे. मातोंडकर यांनी आजच शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मातोंडकर म्हणाल्या की, मला शिवसैनिक म्हणून काम करायचे असून माझी ओळख शिवसैनिक अशीच आहे. शिवसेनेत आल्यानंतर मला शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला आवडेल. कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या अशी चर्चा कायम होत असते. त्याबाबत उर्मिला मातोंडकर यांना विचारले असता मी प्रसंगी सतरंज्या उचलण्यासही तयार आहे असल्याचे मातोंडकर यांनी म्हटले आहे. कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच पुढे जायचे आहे. आज मी माझी ओळख ही शिवसैनिक अशी करुन देते आहे तशीच ती आहे. मी एखाद्या सामान्य कार्यकर्त्याप्रमाणेच काम करणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखततीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.