‘वॉर’ साठी स्वत:वर घेतली प्रचंड ‘मेहनत’ : अभिनेत्री वाणी कपूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार ऋतिक रोशन आणि टॉयगर श्रॉफ ‘वॉर’ सिनेमाचा टीजर नुकताच रिलीज झाला आहे. या टीजरमध्ये अ‍ॅक्शन व्यतिरीक्त आणखी एक गोष्ट प्रेक्षकांचे लक्षे वेधून घेताना दिसली ती म्हणजे अभिनेत्री वाणी कपूरची बिकीनी फिगर. अभिनेत्री वाणी कपूरने बिकिनी बॉडीसाठी खूप मेहनत घेतली आहे. अभिनेत्री वाणी कपूरचं म्हणणं आहे की, या सिनेमासाठी फिट राहण्यासाठी तिला जेवढी मेहनत घेण्याची गरज होती तेवढी मेहनत तिने स्वत:वर घेतली आहे. वाणी म्हणाली की, “प्रेक्षकांकडून एक सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्याने छान वाटत आहे. ही प्रतिक्रिया पाहून मला खरंच खूप आनंद होतो. सिनेमासाठी जेवढा फिटनेस हवा होता त्यासाठी मी स्वत:वर मी खूप काम केलं आहे.”

वाणी कपूरचे वय 30 वर्षे आहे. एक फरफेक्ट बिकिनी बॉडी मिळवण्यासाठी वाणीने पिलेट्स आणि योगासोबतच जीम ट्रेनिंगही घेतली आहे. वाणी म्हणाली की, “मी या प्रोजक्टला घेऊन खूप उत्साहीत होते आणि मला या सिनेमात कसे दिसायचे आहे याबद्दल स्पष्ट माहीत होते. डाएटींग करणं आणि एकही चिट मिल न घेणं हे माझ्यासाठी सर्वात कठिण होतं.”

ऋतिक रोशन आणि टायगर स्टारर वॉर हा सिनेमा सिद्धार्थ आनंद यांनी डायरेक्ट केला आहे. यशराज बॅनरखाली तयार करण्यात आलेला हा सिनेमा हिंदी तामिळ आणि तेलगू भाषेत रिलीज होणार आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –