… तर मी शाहरुख खानाच्या कानशिलात लगावली असती : जया बच्चन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता शाहरुख खान याने ‘चलते चलते’ या चित्रपटातून ऐश्वर्या ऐवजी राणी मुखर्जीला घेतले होते. या निर्णयावरून शाहरुख आणि ऐश्वर्या यांच्यात बरेच दिवस तणाव होते. आता याचा कारणावरून ऐश्वर्याची कडक सासू जया बच्चन देखील शाहरुख खानावर भडकली होती. त्या दरम्यान एका मुलाखतीत जया बच्चन यांनी त्याचा राग व्यक्त करत मी शाहरुखच्या कानशिलात लगावली असती असे म्हंटले होते. सोशल मीडियावर ती मुलाखत व्हायरल झाली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

तर मी एक कानाखाली मारली असती…

शाहरुखने चलते चलते मधून ऐश्वर्याला डच्चू दिल्यानंतर कतरिना कैफ हिच्य़ा वाढदिवसाच्या पार्टित देखील ऐश्वर्याबाबत काही चुकीची वक्तव्य केली होती. त्यानंतरच काही दिवसांनी जया बच्चन यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुखने ऐश्वर्यासोबत जे केले व त्यानंतर तिच्याविषयी जे वक्तव्य केलं त्याविषयी मला त्याच्यासोबत कधी चर्चाच करता आली नाही. मात्र जर कधी शाहरुख माझ्या घरी आला असता तर त्याला मी माझ्या मुलाला मारते तशी एक कानाखाली मारली असती’ असे जया बच्चन यांनी त्या मुलाखतीत म्हटले होते.

जया बच्चन व शाहरुख खान यांनी कभी खुशी कभी गम या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. या चित्रपटात जया बच्चन यांनी शाहरुखची आई व अमिताभ बच्चन यांनी त्याच्या वडिलांची भूमिका केली होती. हा चित्रपट तसेच ‘कल हो ना हो ‘ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते.