चिंताजनक ! इंडियन एअर फोर्सचं AN-32 विमान ‘बेपत्ता’

आसाम : वृत्तसंस्था – वायूसेनेचं एएन ३२ विमान बेपत्ता झाले आहे. दुपारी एक पासून विमानाचा संपर्क तुटला. विमानात ५ प्रवासी आणि ८ क्रू मेंबर्स आहेत. हे विमान अरुणाचल प्रदेशमधून बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच हे विमान बेपत्ता झाले.

बेपत्ता झालेल्या विमानाचा एअरबेसबरोबर असलेला संपर्क तुटल्यामुळे संपर्क होऊ शकत नसल्याचे सांगण्यात येत आहे. या विमानाने आसामच्या जोरहाट येथून उड्डाण केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने उड्डाण केले त्यावेळी १३ लोक विमानात होते. यामध्ये ५ प्रवाशी आणि ८ क्रू मेंबर्सचा समावेश आहे.

एअरक्राफ्ट एन-३२ ने जोहराट एअरबेस येथून दुपारी १२ वाजून २५ मिनटांनी उड्डाण घेतले होते. त्यानंतर दुपारी एक वाजता विमानाचा संपर्क तुटला. भारतीय वायूसेनेने शोध मोहिम सुरु केली आहे. यासाठी सुखोई-३० आणि सी १३० विमानांची मदत घेण्यात आली आहे.