‘त्या’ बेपत्ता विमानाची माहिती देणाऱ्याला ५ लाखाचे बक्षीस

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – वायुसेनेचे हरवलेले AN-३२ विमान सहा दिवसानंतर सापडले नाही. या दरम्यान, वायुसेनेने या विमानाविषयी माहिती देणाऱ्यास ५ लाखांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. संरक्षण पीआरओ विंग कमांडर रत्नाकर सिंह शिलॉंग येथे सांगितले की, एअर मार्शल आरडी माथुर, AOC इन कमांड, इस्टर्न एयर कमांड ने 5 लाख रुपयाच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, बेपत्ता AN-३२ विमानाविषयी माहिती देणाऱ्या व्यक्तीला किंवा समूहाला हे बक्षीस दिले जाईल.

या नंबरवर कळवू शकतात माहिती

विंग कमांडर रत्नाकर ने सांगितले की, विमानाची माहिती ०३७८-३२२२१६४, ९४३६४९९४७७, ९४०२०७७२६७, ९४०२१३२४७७ या नंबरवर देता येईल. वायुसेना हे विमान शोधण्यासाठी प्रत्येक स्तरावर उपाययोजना करत आहे. वायूसेना, अरुणाचलप्रदेश प्रशासन आणि अन्य एजेंसी हे विमान शोधण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत.

६ दिवसानंतर कोणतीही माहिती नाही

भारतीय वायुसेनेचे बेपत्ता विमान AN-३२ शोधण्यासाठी लागणारे विविध एजेंसी अपयशी ठरल्या आहेत. खराब वातावरणामुळे विमान शोधण्यात अडथळे निर्माण होत आहेत.