Video : हवाई दलाने असा केला होता बालाकोट एयर स्ट्राइक, दुसर्‍या वर्धापनदिनी केले अचूक सादरीकरण

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने आजपासून दोन वर्षापूर्वी 26 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी ठिकाणांवर जोरदार एयर स्ट्राइक केला होता. हवाई दलाने या हल्ल्याच्या दुसर्‍या वर्धापनदिनी याचे स्मरण आपल्या खास शैलीत केले. हवाई दलाने यानिमित्त दूरच्या एका सराव ठिकाणाला उद्ध्वस्त केले. या स्ट्राइकचे खास वैशिष्ट्य हे होते की यास स्क्वॉड्रनच्या त्याच सदस्यांनी पार पाडले ज्यांनी प्रत्यक्ष पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या लाँचिंग पॅडवर एयर स्ट्राइक केला होता.

सरावाचा व्हिडिओ जारी
हे सराव मिशन राजस्थानच्या सेक्टरमध्ये पार पाडण्यात आले. हवाई दलाने या सरावाचा व्हिडिओ जारी केला आहे. सूत्रांनुसार, हा स्ट्राइक नुकताच करण्यात आला होता. यानिमित्त शनिवारी हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी प्रत्यक्ष ऑपरेशन पार पाडणार्‍या स्क्वाड्रनसोबत मल्टी एयरक्राफ्ट सॉर्टी उडवले. सूत्रांनुसार या सॉर्टीमध्ये तीन मिराज-2000 आणि दोन सुखोई-30एमकेआय सहभागी होते. भदौरिया यांनी मिराज-2000 उडवले.

हवाई दल प्रमुखांनी घेतले उड्डाण
पीटीआयने म्हटले आहे की, हवाई दलप्रमुख एयर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी या निमित्त त्या स्क्वॉड्रनमध्ये सहभागी पायलट्स सह उड्डाण घेतले. भदौरिया यांनी पाच एयरक्राफ्ट मिशनसह श्रीनगरवरून उड्डाण घेतले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत ते खरे मिशन पार पाडणारे वॉरियर्सच होते. हवाईदल प्रमुखांनी मिग-21 टाइप 69 विमान उडवले.