भारतानं फॉरवर्ड बेसवर तैनात केली लढावू विमानं, आकाशात गरजतायेत जेट्स, वायुसेनेच्या प्रमुखांनी घेतला आढावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत-चीन सीमेवर पूर्व लडाखमध्ये तणाव असतानाच लडाखच्या आकाशात लढाऊ विमाने गर्जत आहेत. तसेच हेलिकॉप्टर्सचा आवाजही वाढला आहे. भारतीय हवाईदलाने आपल्या लढाऊ विमानांना प्रमुख तळांवर तैनात केले आहे. यादरम्यान हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी लेह आणि श्रीनगर एयरबेसचा दौरा केला, जो अशा परिस्थितीत खुप महत्वाचा मानला जात आहे.

भारताने सुखोई 30 एमकेआय, मिराज 2000 आणि जॅग्वार फायटर जेट्स अ‍ॅडव्हान्स पोजिशनमध्ये तैनात केले आहेत, जेथून ते तोबडतोब उड्डाण घेऊ शकतात. भारतीय लष्कराच्या जवानांच्या मदतीसाठी अमेरिकन अपाचे अटॅक हेलिकॉप्टर्ससुद्धा तैनात केले आहेत. चिनूक हेलिकॉप्टर्ससुद्धा लेहमध्ये तयार ठेवली आहेत. एमआय 17व्ही5 मीडियम लिफ्ट चॉपर्ससुद्धा लष्कर आणि सामानाची पूर्तता करण्यासाठी योगदान देत आहेत.

एएनआयने लेह आणि लडाखची काही ताजी छायाचित्रे जारी केली आहेत, ज्यामध्ये हेलिकॉप्टर्स आणि लढाऊ विमाने आकाशात उडताना दिसत आहेत. एयरफोर्स चीफ यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. कारण गलवान खोर्‍यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर देशाच्या संरक्षण प्रमुखांच्या तातडीच्या बैठकीनंतर भदौरिया लागलीच लेहला पोहचले आहेत. सरकारच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, एयरफोर्स चीफ दोन दिवसाच्या दौर्‍यावर होते, त्यांनी ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतला. 17 जूनला भदौरिया लेहला पोहचले आणि नंतर 18 जूनला श्रीनगर एयरबेसचा दौरा केला. हे दोन्ही एयरबेस पूर्व लडाखच्या अगदी जवळ आहेत. हे ऐयरबेस या डोंगराळ भागात एखाद्या एयरक्राफ्ट ऑपेशनसाठी जास्त महत्वाचे आहेत.