किती अतिरेकी मारले हे मोजणे आमचे काम नाही : भारतीय वायुसेना 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने केलेल्या एअर स्ट्राईक-२ मध्ये किती अतिरेकी मारले गेले या आकड्यावरून वरून उलट सुलट चर्चा चालू असताना आता भारतीय वायुसेनेने याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. माध्यमांशी बोलताना भारतीय वायुदलाचे चीफ एअर मार्शल बीएस धनोया यांनी सांगितले आहे की, “भारतीय वायुसेना मृतांची संख्या सांगण्याचे काम करीत नाही. ते सरकारचे काम आहे. आम्ही हे मोजतो की आम्ही आमचे लक्ष्य भेदले आहे कि नाही.”  एअर स्ट्राईक-२ मधील ३५० अतिरेकींच्या मृतांच्या आकड्यावरून भारतीय वायुसेनेने स्पष्टीकरण दिले आहे.

याबरोबरच त्यांनी म्हंटले आहे की, बॉम्ब जंगलात पडले नसते, तर पाकिस्तानने उत्तर दिलं नसतं, किती अतिरेकी मारले हे मोजणं आमचं काम नाही, एअर स्ट्राईकनंतर वायूसेनेचं पहिल्यांदाच स्पष्टीकरण भारतीय वायुसेनेने दिले आहे.

यासंदर्भातील ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेकडून करण्यात आले आहे. दरम्यान भारतीय माध्यमे तसेच काही राजकीय पक्षांकडून देखील एअर स्ट्राईक-२ मध्ये मृतांचा आकडा ३५० असल्याचे पुढे आले होते. त्यानंतर आता या अतिरेक्यांच्या मृतांच्या संख्येवरून उलट सुलट चर्चा सुरु आहेत. आता भारतीय वायुसेनेकडून मात्र याबाबत ते आमचे काम नाही असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझहर संदर्भातील ‘ते’ वृत्त खोटे