IAF MiG-21 Crash | घरावर कोसळलं मिग-21 लढाऊ विमान; दोघांचा मृत्यू, दोन महिला गंभीर जखमी

पोलीसनामा ऑंनलाईन – IAF MiG-21 Crash | भारतीय लढाऊ विमानाचा राजस्थानमध्ये (Rajasthan) भीषण अपघात झाला आहे. भारतीय हवाई दलाचे मिग-२१ या लढाऊ विमानाने सुरतगड (Suratgarh) येथून विमानाने उड्डाण केले होते. मात्र हे विमान सोमवारी (८ मे) सकाळी राजस्थानमधील हनुमानगडजवळ कोसळले (IAF MiG-21 Crash). अपघातादरम्यान वैमानिकाने (Pilot ) प्रसंगावधान दाखवत पॅराशूटच्या मदतीने विमानातून उडी घेत आपला जीव वाचवला.

मात्र, भारतीय हवाई दलाचे मिग-२१ हे लढाऊ विमान एका घरावर कोसळले. परिणामी या घरातील एका महिलेचा व एका पुरुषाचा र्दुदैवी मृत्यू झाला आहे. अद्याप हवाई दलाकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (IAF MiG-21 Crash)

 

या घटनेबाबत स्थानिक पोलीसांकडून अशी माहिती देण्यात आली आहे की, या दुर्घटनेनंतर पायलटला एअरलिफ्ट (Airlift ) करण्यात आले आहे. वैमानिकासाठी हवाई दलाचे Mi 17 पाठवण्यात आले आहे. मिग-२१ ज्या छतावर पडले तिथे तीन महिला आणि एक पुरुष असे लोक उपस्थित होते. यामध्ये एका महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. तर दोन महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. 2

 

Web Title :-  IAF MiG-21 Crash | indian-air-force-mig-21-fighter-aircraft-crashed-near-hanumangarh-in-rajasthan-2-died-2 injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : हिंजवडी पोलिस स्टेशन –
निवृत्त विंग कमांडरची वाहन चालकाकडून 40 लाखांची फसवणूक

Maharashtra Politics News | महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोणाचा?, शरद पवार म्हणाले…

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडक पोलिस स्टेशन – बनावट सोने विकणार्‍या महिलेला अटक

Maharashtra Politics News | महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोणाचा?, शरद पवार म्हणाले…

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – पुण्यातील तथाकथित पत्रकाराला अटक;
महिलेचा विनयभंग करुन दिली धमकी