‘या’ कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची काश्मीरमधून बदली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची काश्मीरमधून बदली करण्यात आली आहे. काश्मीरमधील त्यांच्या सुरक्षेसंदर्भातील कारणावरून बदली करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांची बदली पश्मिमेकडील एखाद्या हवाई तळावर करण्यात येणार आहे.

अभिनंदन सध्या श्रीनगर येथील हवाई तळावर नेमणूकीस आहेत. त्यांची बदली पाकिस्तानच्या सीमेलगतच्या महत्वाच्या हवाई तळावर करण्यात येणार आहे. असे सांगण्यात आले आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानात घूसून हवाई हल्ला केला. त्यावेळी बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळाला लक्ष करून उध्वस्त करण्यात आले. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तनाने भारतात दोन विमानं पाठवून दिली होती. त्या विमानांचा पाठलाग करत असताना विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं मिग २१ हे विमान धारतिर्थी पडलं. ते पॅराशुटच्या साह्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरले.

त्यानंतर पाक लष्कराने त्यांना ताब्यात घेतलं होत. त्यांना पाकने भारताच्या स्वाधीन केले. सध्या ते श्रीनगर हवाई तळावर तैनात होते. दरम्यान त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची श्रीनगर येथून बदली करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे.

Loading...
You might also like