वायु सेनेच्या ‘या’ महिला पायलटने १७ हजार फूटांवर नेलं हेलिकॉप्टर अन् वाचवले ६ जणांचे ‘प्राण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  एका वायुसेनेतील महिला पायलटने १७ हजार फूटावर हेलिकॉप्टर उडवत अनेकांचे जीव वाचवले. या महिलेने एवढ्या उंचावर हेलिकॉप्टर चालवले की जेथे अत्यंत जास्त रिस्क होती. या शुर महिला पायलटचे नाव आहे सुरुभि सक्सेना. तर या सर्व मोहिमेत वायुसेनेचे पायलट आणि डिप्टी कमिशनर अन्वी लवासा यांनी त्यांचे नेतृत्व केले. हे प्रकरण १८ जुलैचे आहे. यावेळी लेह लद्दाखच्या स्टोक कांगरीमध्ये गिर्यारोहकांचा एक समूह सततच्या बर्फवृष्टीमुळे दगडांमध्ये अडकून बसला होता.

२ गिर्यारोहक जखमी
गिर्यारोहकांनी ज्या दोरखंडाचा वापर केला होता त्यावरुन त्यांचे हात घसरत होते. या परिस्थितीत या गिर्यारोहक स्वत:ला मोठ्या दगडाच्या आधारे वाचवण्याचा प्रयत्न करत होते. या दरम्यान दोन गिर्यारोहक जखमी झाले. यानंतर त्यांच्या बरोबर असलेल्या गाइडने आणि बेस कॅपवर असलेल्या लोकांनी जिल्हा प्रशासनाला लगेचच संपर्क साधून महिती दिली.

यानंतर लेहच्या डिवीजनल कमिशनरने या दुर्घटनेचे गंभीरता पाहता, इंडियन एअर फोर्सला मदत मागितली, या दरम्यान दोन्ही जखमींना गाइडने मैदानी भागात आणले. त्यानंतर सुरुभि सक्सेना तेथे हेलिकॉप्टर घेऊन पोहचली आणि त्यांची मदत करुन त्यांना तेथून सुरक्षित बाहेर काढले.

असे पहिलेच रेस्क्यु ऑपरेशन पाहिले
गाइडने सांगितले की, महिला पायलटची हिंमत पाहून मला पण हिंमत मिळाली. विशेष बाब ही होती ही ती महिला पायलट होती. एक ट्रेकिंग कंपनीचे ऑर्गनायजर जायो ताशी नुरबू यांनी सांगितले की, मी अनेक प्रकारचे रेस्क्यू ऑपरेशन पाहिलेत पण असे रेस्क्यू ऑपरेशन पहिल्यांदाच पाहिले. एखाद्या अडकलेल्या व्यक्तीची मदत करणे यापेक्षा ६ लोकांना एक सोबत मदत करणे हे अवघड काम होते.