भारतीय वायुसेनेची ऑनलाईन गेम होणार लॉन्च ; पहा टीजर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन एयर फोर्स (IAF) आता भारतात आपली एक मोबाइल-बेस्ड एयर कॉम्बैट गेम लॉन्च करायच्या तयारीत आहे. ऑनलाइन गेम च्या माध्यमातून एरफोर्स युवकांना सेनेमध्ये आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. हि गेम वायुसेनेचे प्रमुख वीरेंद्र सिंह धनोआ हे लॉन्च करतील.

ही गेम अँड्रॉइड आणि अ‍ॅपल या दोन्ही उपकरणांवर चालणार आहे. या गेम मध्ये प्लेयर्स टच कंट्रोल किंवा ऑन-स्क्रीन बटन्स च्या साहाय्याने एयरक्राफ्ट प्लेन उडवू शकतील. यामध्ये अँटी एयरक्राफ्ट गन देखील मिळणार आहे ज्याद्वारे शत्रूच्या हेलिकॉप्टरला शूट करता येईल आणि याद्वारे शत्रूचे रडारदेखील उध्वस्त करता येईल.

लॉन्च करण्याआधी वायुसेनेने २० जुलै ला ट्विटर वर या गेम चा एक टीजर देखील टाकला आहे ज्याला प्रचंड प्रमाणावर सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. आत्तापर्यंत या टीजरला ४३,६०० पेक्षा देखील जास्त लोकांनी पहिले आहे आणि ७००० पेक्षा जास्त लाईक मिळाल्या आहेत. तसेच जवळपास २००० वेळा ते रिट्विट देखील केले गेले आहे.

भारतात ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ
स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असलेले इंटरनेट आणि स्मार्टफोन च्या वाढत्या विक्रीमुळे भारतात ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. KPMG आणि Google यांच्या अहवालानुसार ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांची संख्या २०१० मध्ये २ कोटी होती जी २०१८ पर्यंत २५ कोटी एवढी झाली आहे. तर २०२१ पर्यंत हीच संख्या ३४ कोटींपर्यंत जाणार असल्याचे वर्तविले गेले आहे.

त्यामुळे याचा वापर करून वायुसेना युवकांना सेनेत भरती होण्यासाठी प्रेरित करणार आहे. या गेम चे वैशिष्ठ्य म्हणजे वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे देखील कॅरॅक्टर यात असणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like