डोळ्यांची ‘दृष्टी’ गेल्यानंतर देखील नाही हरलं ‘नशीब’, ती बनली देशातील पहिली अंध IAS

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमचा आत्मविश्वास मोठा असेल आणि कष्ट करण्याची जिद्द असेल तर तुम्ही कितीही मोठे अवघड आव्हान पेलवू शकता. याचेच एक मोठे उदाहरण आहे महाराष्ट्रातील प्रांजल पाटील. वयाच्या सहाव्या वर्षी प्रांजलचे दोनीही डोळे गेले मात्र तरीही प्रांजलने स्वप्न पाहण्याचे ठरवले आणि अभ्यास करून मोठे यश मिळवले.

नेत्रहीन असूनही आएएस झालेली प्रांजल ही एकमेव व्यक्ती आहे. महाराष्ट्रातील उल्लासनगर येथे राहणाऱ्या प्रांजलने 14 ऑक्टोबर रोजी तिरुअनंतपुरम येथे उप जिल्हाधिकारी पदाचा कार्यभाग सांभाळला. प्रांजलने पहिल्याच प्रयत्नात युपीएसीच्या परीक्षेत पास होऊन 773 वा क्रमांक पटकावला.

सहा वर्षांची असताना गमवावी लागली होती दृष्टी
30 वर्षांच्या प्रांजल लहान असतानाच दृष्टिहीन झाली मात्र त्यानंतर खचून न जाता तीने मुंबईच्या दादर मधील कमला मेहता स्कूलमधून आपले दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर चंदाबाई कॉलेज मधून बारावीची परीक्षा दिली. पुढील शिक्षणासाठी तिने मुंबईमधील सेंट जवेरी कॉलेज जॉईन केले. तेव्हाच प्रांजलला युपीएससी बाबत माहिती मिळाली. दिल्लीच्या जेएनयू कॉलेजातून प्रांजलने आपले एमए देखील पूर्ण केले. प्रांजलचे वडील सरकारी नोकरी करतात तर आई गृहिणी आहे.

कधीच हिम्मत हारु नका – प्रांजल पाटील
आयुष्यात संकट येत राहतात परंतु म्हणून थांबू नका प्रयत्न करत रहा. कधीच हिम्मत हारु नका तुम्ही नक्की यशस्वी व्हाल असे मत प्रांजलने व्यक्त केले आहे. उप जिल्हाधिकारी म्हणून आता प्रांजलने आपला पदभार स्वीकारला आहे.

नेत्रहीन असल्यामुळे रेल्वेने नोकरी देण्यासाठी दिला होता नकार
2015 युपीएससीची परीक्षा पास झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने प्रांजलला दृष्टिहीन असल्यामुळे नोकरी देण्यासाठी नकार दिला होता. त्यानंतर ही प्रांजलने हार मानली नाही आणि आपले प्रयत्न सुरूच ठेवले. 2016 मध्ये पुन्हा परीक्षा देऊन प्रांजलने 124 वा क्रमांक पटकावला. त्यानंतर ट्रेनिंग झाल्यावर प्रांजलकडे उपजिल्हाधिकाऱ्याचा पदभार देण्यात आला.

 

Visit : Policenama.com

You might also like